आसवनी प्रकल्पा संदर्भात महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने पर्यावरणविषयक जाहिर जनसुनावणी संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा. (राज सारवाडे )
महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने दामाजी कारखान्याच्या नियोजीत आसवनी प्रकल्पाबाबत कारखाना कार्यस्थळावर जाहीर जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. संत दामाजी साखर कारखान्यामध्ये केन ज्यूसवर आधारीत आसवनी प्रकल्प नियोजीत आहे. तसेच तिन मेट्रिक टन पॉवर प्लान्ट उभारणी करणे, सध्याची गाळप क्षमता वाढवून ती प्रति दिवस ४९०० मे.टन करणे यासंदर्भात मंगळवार दि. १८/१०/२०२२ रोजी कारखाना कार्यस्थळावर जाहीर जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते.
अप्पर जिल्हाधिकारी सौ.क्षमा पवार मॅडम, राज्य प्रदुषण मंडळ सोलापुरचे एस.आर.ओ.श्री अजीत पाटील साहेब, मंगळवेढयाचे तहसिलदार श्री. स्वप्नील रावडे साहेब यांच्या समोर सदरची सुनावणी पार पडली. कारखान्याचे आसपासच्या कांही गावांतील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ही जनसुनावणी पार पडली. आजूबाजूच्या भागातील जैव विविधता, पाणी, माती, आवाज यावर या प्रकल्पाचा कांही परिणाम होणार आहे काय. शेतकरी सभासदांना काय फायदा/तोटा होणार. याबाबत श्री संतोष रोकडे, तुषार कापसे, अनिल रसाळ, संगीता वासनीक, सुवर्णा जावीर, दिलीप पुजारी, साईकिरण पाटील, निळकंठ यांनी प्रश्न विचारले.
या प्रकल्पामुळे रोजगार निर्मीती व उद्योगधंदे वाढीस चालणा मिळणार असल्याचे पर्यावरण सल्लागार यांनी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कार्यकारी संचालक सुनिल दळवी यांनी डिस्टीलरी प्रकल्पातील उत्पन्नामुळे कारखान्याचे उस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर देता येणार असलेचे नमुद करुन उपस्थितांचे आभार मानले. परिसरातील महिला पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते. एकंदरीत या सुनावणीमध्ये उपस्थितांचे प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली.
या सुनावणीप्रसंगी कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील, व्हा.चेअरमन श्री तानाजी खरात, संचालक श्री गोपाळ भगरे, श्री भारत बेदरे, श्री महादेव लुगडे, श्री दयानंद सोनगे, श्री दिगंबर भाकरे, श्री रेवणसिध्द लिगाडे, श्री तानाजी कांबळे, श्री भारत पाटील, कारखान्याचे खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा