मुंबई प्रभाग रचनेचा निर्णय आता हायकोर्टात
शिवशाही वृत्तसेवा नवी दिल्ली
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिकांची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयासमोर येतात दहा नोव्हेंबरला होणार आहे. मुंबई सह सर्व महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या सदस्यांची वाढलेली सदस्य संख्या शासनाने गेल्या चार ऑगस्टला रद्दबादतल ठरवून कमी केली होती व निवडणूक आयोगाने निवडणुकीची केलेले सर्व प्रक्रियाही रद्द पादतल ठरवली होती.
शासनाच्या अध्यादेशामुळे निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या जाणार असा मुद्दा उपस्थित करून या सर्व याचिका सादर केल्या होत्या. या संदर्भातील याची कांवर येत्या दहा नोव्हेंबरला सुनावणी होणार असल्याचे निर्देश धनंजय चंद्रचूड व न्या हिमा कोहली यांच्या खंडपीठाने दिले. चार ऑगस्टच्या आद्य देशाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई येथील राजू पेडणेकर सुहास वाडकर औरंगाबाद येथील पवन शिंदे यांनी सादर केल्या आहेत.
मुंबई प्रभाग रचनेचा निर्णय आता हायकोर्टातमुंबई महापालिकेच्या प्रभागांच्या संख्येत वाढ करण्यासंदर्भात दाखल केलेली याची का बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली. व यावर उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना प्रभाग संख्या 227 वरून 236 केली होती. सत्यांतरानंतर शिंदे - फडणवीस सरकारने पुन्हा संख्या 227 केली याला राहुल वाघ व पवन शिंदे यांनी आव्हान दिले होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा