maharashtra day, workers day, shivshahi news,

देशाचे पन्नासाव्या सरन्यायाधीश पदी मराठमोळे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड

 न्या. चंद्रचूड देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश नऊ नोव्हेंबरला  घेणार शप्पथ

Justice Dhananjay Y. Chandrachud, Justice Chandrachud Chief Justice of the country, will take oath on November 9, President Draupadi Murmu, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड यांची देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ नऊ नोव्हेंबर 2022 पासून सुरू होत आहे. केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी टिट करून ही माहिती दिली.

विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती यांचा कार्यकाळ 8 नोव्हेंबर रोजी संपत आहे. सरकारने सात ऑक्टोंबर रोजी लळीत यांना पत्र देऊन त्यांच्या उत्तराअधिकाऱ्यांची शिफारस काढण्याची विनंती केली आहे. याला उत्तर म्हणून सरन्यायाधीश ललित यांनी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांचे नाव पाठवले होते त्या राष्ट्रपतींनी संमती दिली आहे.

ज्येष्ठता यादीनुसार, न्यायमूर्ती चंद्रपूर हे विद्यमान सरन्यायाधीश लळीत यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ आहेत. न्या. चंद्रचूड यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल. न्यायमूर्ती चंद्रचूड हे आयोध्या जमीन विभाग आणि गोपनीयतेचा अधिकार यासारख्या ऐतिहासिक निकालाचा भाग आहेत.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !