कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्यात दुरावा
बॉलिवूड मध्ये जेवढ्या वेगाने नाती जुळतात तेवढ्याच वेगाने ती तुटतातही . इथे कधी कुणाचे कुणावर प्रेम होईल आणि कधी ब्रेकअप होईल सांणगत येत नाही. पैसा आणि प्रसिद्धीलाच सर्वस्व मानणाऱ्या हिंदी चित्रपट सृष्टीत नात्यांच्या जपणुकीची अपेक्षाच करणे चूक आहे. दीर्घकाळ टिकलेली उदाहरणे बॉलिवूड मध्ये क्वचितच पाहायला मिळते. सैफ अली खान आणि अमृता सिंग याची लेक सारा अली खान हिचे आणि कार्तिक आर्यन यांचे रिलेशन सुद्धा असेच अल्पजीवी ठरले आहे.
अभिनेत्री सारा अली खानने एका रियालिटी शोमध्ये कार्तिक आर्यन आवडत असल्याचं मान्य करत त्याला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ' लव आज कल ' चित्रपटाच्या चित्तीकरणादरम्यान कार्तिक आणि सारा यांच्यातील जवळीक वाढली. ' लव आज कल ' च्या शूटिंगच्या वेळी सारा आणि कार्तिक यांच्यातील जवळीक आणखीन वाढल्याचे दिसून आले तर एकत्र जाताना दिसले होते. आशा दोघांची मैत्री पाहून सर्वांना वाटलं होतं की दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले आहेत आणि लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतील.
पण जसा हा चित्रपट प्रदर्शित झाला या दोघांमध्ये दुरावा वाढल्याचे दिसून आले त्यांच्या भेटी कमी झाल्या आणि दोघेही आपापल्या कामात व्यग्र राहू लागले. एवढेच नाही तर एकमेकांसह फोटो काढण्यासही नकार देऊ लागले. दरम्यान मागच्या काही काळापासून सारा अली खानच नाव क्रिकेटर शुभमंग गिलिशी जोडले जातय. काही मीडिया रिपोर्टसनुसार या दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंड च्या माध्यमातून झाली होती.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा