गौरी खान मुलगी सुहानाला म्हणाली "दोन मुलांसोबत डेटिंग नको"
एका लोकप्रिय रियालिटी शोमध्ये नुकते शाहरुख खानची पत्नी गौरी , चंकी पांडेची पत्नी भावना आणि संजय कपूरची पत्नी महीप यांनी हजेरी लावली होती. या शोच्या आगामी व्हिडिओ करण जोहरने शेअर केला या एपिसोड मधील महत्त्वाचा आकर्षण होती ती गौरी खान. कारण ती फारशी कोणत्या शोमध्ये पाहायला मिळत नाही. या भागात शाहरुख खानचा केमिओ देखील आहे, म्हणजे गौरी खान शो मध्ये त्याच्याशी फोनवरून संवाद साधताना दिसेल. इतकच नाही तर करण गौरीला विचारणार आहे की ती डेटिंगच्या बाबतीत सुहाना ला काय सल्ला देईल. त्यावरती मजेशीर उत्तर देताना दिसणार आहे. ती म्हणाली की, एका वेळेला कधीच दोन मुलांना डेट करू नको.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा