सुप्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचे निधन
विनोदाच्या बादशहाचे अकाली निधन
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे आज दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ४२ दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. गेल्या महिन्यात नेहमीप्रमाणे सकाळी व्यायाम करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. त्यांची ऍन्जोप्लास्टी देखील झाली होती मात्र गेले काही दिवस ते कोमट गेले होते. तब्बल ४२ दिवस त्यांनी मृत्यूला दिलेली झुंज, आज अखेर संपुष्टात आली. वयाच्या ५८व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
खळखळून हसवणारा कलाकार
राजू श्रीवास्तव यांनी छोट्या-मोठ्या कार्यक्रमातून आपला कला प्रवास सुरु केला होता. अनेक चित्रपट कलावंताच्या ते हुबेहूब नकला (mimicry) करत असत. विशेषतः अमिताभ बच्चन यांची त्यांनी केलेली मिमिक्री लोकांना फारच आवडत होती, त्यामुळे त्यांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला होता. अतिशय खडतर मार्गातून वाट काढत त्यांनी ८०च्या दशकाच्या शेवटी चित्रपट सृष्टीत पाय ठेवला. राजू श्रीवास्तवयांचा नैसर्गिक अभिनय आणि विनोदबुद्धीमुळे ते रसिकांच्या गळ्यातला ताईत बनले होते. अनेक चित्रपटात त्यांनी लक्षवेधी भूमिका केल्या. त्याच बरोबर लाफ्टर चॅलेंज सारख्या रियालिटी शोमधून त्यांनी आपल्या कलेची दाखल घेण्यास भाग पडले. उत्तरप्रदेशमध्ये चित्रपट सृष्टी निर्माण करण्याच्या, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महत्वाकांक्षी योजनेचेही ते सल्लागार प्रतिनिधी होते.
राजकारणातही सक्रिय होते राजू श्रीवास्तव
चित्रपट आणि मंचीय सदारीकरणाच्या दुनियेत मुक्त मुशाफिरी करणारे राजू श्रीवास्तव राजकारणातही सक्रिय होते. ते भाजपचे सक्रिय नेते होते. उत्तर प्रदेश भाजपमध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि योगी आदित्यनाथ यांच्या कार्यशालीने ते प्रभावित होते. भाजप विरोधी शक्तींचा ते आपल्या सोशल मीडियावरून त्यांच्या खास अनोख्या शैलीत खरपूस समाचार घेत असत.
मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
राजू श्रीवास्तव यांचे अकाली निधन झाल्याने चित्रपट क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह , मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा