maharashtra day, workers day, shivshahi news,

आम आदमी पार्टीच्या पंढरपूर शाखेचे उद्घाटन - नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही जाहीर

आम आदमीची आशा फक्त केजरीवाल - माजी खासदार हरिभाऊ राठोड

arvind kejariwal, aam adami party, AAP, maharashtra, election, shivshahi news,

     ठळक
  • आम आदमी पार्टी महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढवणार
  • आम आदमी पार्टीच्या पंढरपूर शाखेचे उदघाटन
  • आम आदमी पार्टी पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक लढवणार
  • आम आदमी पार्टीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर

शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर 

देशात आणि राज्यात शिवसेना, भाजपा, काँग्रेससह इतर पक्षावर जनता नाराज आहे. आज नरेंद्र मोदींना सोडून जनता केजरीवाल यांना ऐकत आहे. राजकीय अस्थिरतेच्या या काळात एक जनतेला एकच अशा आहे, ती म्हणजे अरविंद केजरीवाल 'आम आदमी पार्टी'  असे मत आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केले. बुधवारी त्यांनी पंढरपूरमध्ये आम आदमी पार्टीच्या शाखेचे उद्घाटन केले त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष एम. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले, जिल्हा खजिनदार प्रमोद अवताडे, आदींसह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बुधवारी आम आदमी पार्टीचे राज्यातील प्रमुख नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते पंढरपूरमधील आम आदमी पार्टीच्या शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, "एक महिन्यापूर्वी आपण आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये पार्टीचा बोलबाला आहे. शाळा ,वीजमाफी, आरोग्यविषयक सुविधा यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मोठी प्रसिद्धी झाली आहे. आता गुजरातमधील जनतेने त्यांना डोक्यावर घेतले आहे. राज्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह इतर पक्षांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. "

पंजाबात त्या वेळच्या सरकार विरोधात नाराजी होती. याचाच फायदा आम आदमी पार्टीला झाला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण जनता लक्ष देऊन ऐकत होती. आता यात बदल झाला आहे. देशात महागाईबरोबरच बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यास जबाबदार देशातील भाजपाचे सरकारच आहे. यामुळे जनतेची आशा आता फक्त केजरीवाल सरकार बनली आहे. जनता आता केजरीवाल यांना ध्यान देऊन ऐकू लागली आहे. राज्यातील सर्वच निवडणुका आम आदमी पार्टी मोठ्या जिद्दीने लढणार आहे, आणि या पार्टीचे प्रचारक आम आदमी म्हणजे सामान्य जनता आहे.

पंढरपूरमधील उद्योजक श्रीरंग बागल यांनी नुकताच आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. पंढरपूर तालुक्याचे संघटक म्हणून यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ, मा. खा. हरिभाऊ राठोड यांच्या हस्ते पार पडला.याप्रसंगी ज्येष्ठ नेते चंद्रकांत पवार, आम आदमी पार्टीच्या जिल्हा युवकचे अध्यक्ष गगन गोडसे ,अशोक भोसले, चंद्रकांत मस्के वाखरी, किशोर शिंदे, श्रीधर गायकवाड, बंडू मोरे, रावसाहेब पवार, राजाभाऊ फुगारे, आदींसह आम आदमी पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पंढरपूरमधील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने आपला उमेदवार जाहीर केला असून, आम आदमी पार्टीचे तालुका समन्वयक श्रीरंग बागल हेच ही निवडणूक लढवणार आहेत. याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !