सोनम ने मुलाचे नाव ठेवले ' वायू '
अभिनेत्री सोनम कपूर ने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आज सोशल मीडियावर सोनम कपूर ने एक पोस्ट शेअर करत बाळाचं नाव सांगितले आहे. आई बाबा बनल्यानंतर सोनम - आनंद प्रचंड आनंदी आहेत . सोनम-आनंद यांनी आता त्यांच्या मुलाचं नाव उघड केलं आहे. सोनम च्या बाळाला आज एक महिना पूर्ण झालाय.
त्यानिमित्ताने सोशल मीडियावर सोनवणे एक पोस्ट शेअर करत बाळाचं नाव सांगितलं आहे. या दोघांनी मुलाचे नाव ' वायू ' असे ठेवले आहे. सोनवणे इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांच्या बाळाचा नावाचा अर्थ सांगताना लिहिले , आमच्या जीवनात नवीन आनंद आला आहे. हनुमान आणि भीम यांच्या प्रेरणेने, ज्यांनी अपार धैर्य आणि सामर्थ्य प्रकट केले आहे. आम्ही आमच्या मुलासाठी , वायु कपूर आहुजा साठी त्यांचे आशीर्वाद मागतो. हिंदू ग्रंथामध्ये वायू हा पंचतत्वा पैकी एक आहे. तो श्वासोच्छ्वासाची देवता आहे, हनुमान,भीम आणि माधव याचे आध्यात्मिक पिता आहे. वाऱ्याचा शक्तिशाली स्वामी ' वायु ' अशी भावना तिने व्यक्त केली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा