maharashtra day, workers day, shivshahi news,

बेपत्ता झालेल्या सात वर्षीय मुला २९ तासांनी मृतदेह सापडला

अपहरण करून मागितली होती २० कोटींची खंडणी

The body of a seven-year-old boy , was found 29 hours later, 20 crore extortion, By kidnapping, pimpari-chinchwad, pune, shivshahi news

खेळायला इमारतीच्या बाहेर पडला होता

खेळायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेला मुलगा बेपत्ता झाला होता. ही घटना गुरुवारी दिनांक ८ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली होती. त्यानंतर अपहरण प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. शुक्रवारी रात्री उशिरा त्या मुलाचा मृतदेह मिळून आला आहे. या मुलाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

एका इमारतीच्या टेरेसवर सापडला मृतदेह खून झाल्याचे निष्पन्न

आदित्य गजानन ओगले असे या सात वर्षाच्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील गजानन ओगले यांनी आदित्यचे अपहरण झाल्या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्यादी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "खेळायला जातो," असे सांगून आदित्य गुरुवारी सायंकाळी घरातून बाहेर पडून इमारतीच्या खाली आला होता. त्यानंतर तो कोणालाही दिसला नाही. त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी शोध सुरू केला, मात्र तो सापडला नाही. त्यामुळे आदित्यच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून एका तरुणाकडे करून चौकशी केली, त्यावेळी आदित्यचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. आदित्य याचा मृतदेह भोसरी एमआयडीसी येथील एका पडक्या इमारतीच्या टेरेसवर मिळून आला. 

वीस कोटींची खंडणी मागितली होती

मयत आदित्य याचे वडील गजानन ओगले हे बांधकाम व्यवसायिक आहेत. आदित्य बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना फोनवरून वीस कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे हा अपहरणाचा प्रकार असावा असे वाटत होते, मात्र पोलिसांना यामध्ये वेगळा संशय येत आहे. कारण आरोपी आणि मयत एकाच बिल्डिंगमध्ये राहत होते. आदित्य बेपत्ता झाल्याचे समजतात, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पिंपरी पोलीस ठाण्याचे स्थानिक तपास पथक, तसेच गुन्हे शाखेचे गुंड विरोधी पथक व इतर पथकांकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू आहे.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !