चेअरमन श्री शिवानंद पाटील यांचे हस्ते श्री संत दामाजी कारखान्यावर श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर श्री गणेश चतुर्थीच्या निमीत्ताने कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील यांचे हस्ते विधीवत पुजन करून श्री गणेश प्रतिष्ठापणा करण्यात आली. तसेच सदर प्रसंगी कारखान्याने जनता अपघात विमा पॉलीसी अंतर्गत विमा उतरविलेला असून मयत झालेल्या सभासदांचे वारसांना नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी एक लाख रुपये प्रमाणे चेकचे वितरण करण्यात आले असलेची माहिती कार्यकारी संचालक श्री. सुनिल दळवी यांनी दिली. सदर प्रसंगी कारखान्यांचे व्हा.चेअरमन श्री (तानाजी खरात, संचालक श्री औदुंबर वाडदेकर, श्री राजेंद्र चरणु पाटील, श्री रेवणसिद् लिंगाडे, श्री गौडामा बिराजदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कारखान्याने जनता अपघात विमा पॉलीसी अंतर्गत सभासदांचा विमा उतरविलेला असुन दुर्दैवाने अपघाताने मयत झालेले सभासद स्व. सिध्दाप्पा शंकर बिराजदार, लोणार यांच्या वारस श्रीमती उमा सिध्दाया बिराजदार व स्व. जालींदर बाजी खिलारे यांच्या वारस श्रीमती केशर जालिंदर खिलारे यांना प्रत्येकी एक लाख रुपयाचा चेक कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील व व्हा. चेअरमन श्री तानाजी खरात यांचे हस्ते याप्रसंगी देण्यात आले.
श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा झाली असुन येणाऱ्या सन २०२२-२३ गळीत हंगामासाठी ६ लाख मे. टन गाळप करण्याचे संचालक मंडळाने उदिदष्ट ठेवलेले आहे. गळीत हंगामाचे उदिदष्ट पूर्तीसाठी सर्व कर्मचान्यानी सहकार्य करून गाळप हंगाम यशस्वी करावा असे आवाहन सदर प्रसंगी बोलताना चेअरमन श्री. शिवानंद पाटील यांनी केले. यावेळी चिफ इंजिनिअर श्री धैर्यशील जाधव, चिफ अकौंटंट श्री रमेश गणेशकर, शेती अधिकारी श्री के.एस. ठवरे, कार्यालयीन अधिक्षक श्री डी. बी. फटे, स्टोअर किपर श्री यु.एम.भुसे, सुरक्षा अधिकारी श्री एल. ए. बेदरे, हेड टाईम किस श्री ए.एन. शिनगारे, केनवार्ड सुपरवायझर श्री पी.बी.पाटील, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कामगार संघटणेचे अध्यक्ष श्री विठ्ठल गायकवाड, जनरल सेक्रेटरी श्री. भारत मासाळ व कामगार उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा