पदार्थ विज्ञान शास्त्र या विषयांतर्गत संशोधन
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
पंढरपूरचे सुपुत्र अमरसिंह विक्रमसिंह ठाकुर यांना दि. ०७/०९/ २०२२ रोजी पदार्थ विज्ञान शास्त्र या विषयांतर्गत पॉली पायरोल बेस्ट कोबाल्ट ऑक्साईड ॲन्ड रूदेनीयम ऑक्साईड नॅनो कंपोसीट्स ॲन्ड लेअर इलेक्ट्रोकेमीकल कॅरॅक्टरायझेशन वर संशोधनासाठी पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. या पदवीचे संशोधन कार्यान्वित त्यांचें आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ३० शोध निबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये २८ शोध निबंध आणि २ समिक्षा पत्रे प्रकाशित झाले आहेत.त्याचप्रमाणें
क्रेंब्रीज विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय परिषदेत विशेष सन्मानचिली येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत विशेष सन्मान
सोकिंग ॲंन्ड ड्रायींग टेक्नीकचे जनक असलेल्या या संशोधकांचा एक शोधनिबंध नासाच्या ADSAB डाटा बेसमध्ये स्विकारले असुन super capacitor वर संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या google scholar च्या जागतिक क्रमवारीत ते जगाच्या २८ व्या क्रमांकावर आहेत.
सदर शोध कार्यात त्यांचे मार्गदर्शक प्रा.लोखंडे बी.जे.आणि पुण्यश्लोकी अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे (Punyashloki Ahilyabai Holkar Solapur University) कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रा.आर.एस.माने (राष्ट्र संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नांदेड) , प्रा.एच. एम.पठाण(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ),प्रा.एस.बी.कोंडावार(स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नागपूर),प्रा.सी.एम.महाजन(विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे) यांचे मार्गदर्शन आणि विशेष सहकार्य लाभले.मित्र परिवारातील धीरज मुत्तीन, रिसर्च स्कॉलर्स सोलापूर विद्यापीठ सोलापूर. त्याच प्रमाणे इतर अनेक मित्र परिवाराच्या प्रोत्साहनाने आणि मदतीने हे कार्य शक्य झाले अशी भावना अमरसिंह ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
सुपर कॅपॅसीटरचे भविष्यातील उपयोग पाहता त्यांची निर्मिती आणि संशोधन यांमध्ये करिअर करण्यासाठी तरुण पिढीने जास्तीत जास्त प्रयत्न करावेत त्यासाठी कोणतेही सहकार्य लागल्यास आपण ते करण्यासाठी तयार आहोत असेही अमरसिंह ठाकूर यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा