सजवलेल्या नयनरम्य रिक्षा आणि खतरनाक स्टंटबाजी
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले फाउंडेशन च्या वतीने फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल डोके यांनी राज्यस्तरीय ऑटो रिक्षा सौंदर्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या. राज्यभरातून ऑटो रिक्षा चालक मालकांनी या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला. स्पर्धेत सहभागी रिक्षा वैविध्यपूर्ण सजावट केलेल्या होत्या. रिक्षांच्या सौंदर्य स्पर्धेसाठी रॅम्प तयार केला होता. अतिशय सुंदर सजावटीने युक्त रिक्षा एकेक करून रॅम्पवर आपले प्रदर्शन करीत होत्या. तसेच रिक्षाचालकांनी आपले रिक्षा ड्रायव्हिंग कौशल्य दाखवत, रिक्षांच्या चित्ताकर्षक कसरती केल्या. रिक्षांच्या सौंदर्यस्पर्धा चे उद्घाटक माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील रिक्षांच्या सौंदर्य स्पर्धांचा व कसरतींचा आस्वाद घेतला.
ऑटो रिक्षा सौंदर्य स्पर्धेत राज्यस्तरीय गटात, कोल्हापूरचे तानाजी भोसले प्रथम, कराडचे संग्राम शिंदे द्वितीय आणि पुण्याचे विवेक खराडे तृतीय, असे यश मिळवले. जिल्हास्तरीय गटात सोलापूरचे राहुल मोरे प्रथम, पंढरपूरचे मोहन लाड द्वितीय, तर पंढरपूरचेच पिंटू फुलारे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. दोन्ही गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 3333, 2222 आणि 1111 रुपये रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, असे पारितोषिक देण्यात आले. तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती, अमित डोके यांनी दिली आहे. रिक्षा सौंदर्य स्पर्धा पाहण्यासाठी पंढरपूरच्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रांतीसुर्य फाऊंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
VIDEO:-
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा