पंढरपूरच्या प्रसिद्ध जिम मधील प्रशिक्षकाला पोलीसांकडून अटक
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूर मधील एका जीम प्रशिक्षकाकडून जीम सरावाच्या नावाखाली अनेक महीला व मुलींची लैगिक छळवणूक केल्याचे उघड झाले आहे आरोपी जिम प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूर शहरात राहणारे एका कुटूंबातील पती पत्नीने आपली शारीरीक तंदुरुस्ती चांगली रहावी म्हणून पंढरपूर येथील एका नामांकित जीम मध्ये १८ जानेवारी २०२२ रोजी पासून जाणे चालू केले होते. त्यांनी जीम मध्ये प्रवेश घेताना त्याचे मोबाईल नंबर जीम मध्ये दिलेले होते.
सुरवातीला जीम मधील प्रशिक्षक श्रीकांत राजू गायकवाड, वय २६ वर्षे रा, पंढरपूर याने डायट घेण्याची माहिती देणेसाठी विवाहीत स्त्रीस तिचे मोबाईलवर फोन करण्यास सुरवात केली. त्यानंतर श्रीकांत गायकवाड याने या स्त्रीचे मोबाईल फोनवर कॉल करुन तसेच वॉटसअप मेसेज करून तिचेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करु लागला. त्यावेळी या स्त्रीने त्यास "तुम्हाला ज्या कांही सूचना दयावयाच्या असतील त्या आम्ही जीम मध्ये आल्यावर देत जा" असे सांगीतले. तरी देखील श्रीकांत गायकवाड हा वेळी अवेळी तिचे मोबाईलवर कॉल करणे, वॉटसअप मेसेज, वॉटसअप व्हिडीओ कॉल करणे, इन्टाग्राम चॅटींग, फेसबुक चॅटीग, स्नॅपचॅट अशा प्रकारे चॅट करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. हि विवाहित स्त्रीचे पती ज्यावेळी कामानिमीत्त बाहेर असताना ती एकटी जीममध्ये जात होती त्यावेळी त्या संधीचा फायदा घेवून श्रीकांत गायकवाड हा या विवाहित स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे तसेच व्यायामाच्या सूचना देण्याचा बहाणा करून वाईट हेतुने तिला स्पर्श करणे, असे प्रकार करत होता. श्रीकांत गायकवाड याचेकडून या होत असलेल्या कृत्या बाबत या विवाहित स्त्रीने आपल्या पतीला सांगीतल्यावर त्या दोघांनी जिम सोडण्याचा निर्णय घेतला, व जीम मध्ये जाणे बंद केले. त्यानंतर आरोपीने वेळोवेळी पीडीत स्त्रीला तीचे व्हॉटसअप चॅटींग, फोटो तीच्या पतीला दाखवण्याची धमकी दिली.
पीडीत स्त्रीने आरोपी श्रीकांत राजू गायकवाड याचे पासून होत असलेला त्रास तीला असहय झाल्याने आपले पती समवेत पंढरपूर शहर पोलीस ठाणेत येवून श्रीकांत राजू गायकवाड वय २६वर्षे रा. पंढरपूर याचे विरोधात तक्रार दिल्याने दि १०/०४/२०२२ रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाणेत गुन्हा रजि क २६४/२०२२ भारतीय दंड संहिता कलम ३५४,३५४ (अ), ३५४ (क), ३५४ (ड), ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला काल रात्री पोलीसांनी अटक केली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडी मध्ये आहे.
या दाखल झालेल्या गुन्हयात श्रीकांत राजू गायकवाड, यास पोलीसांनी अटक केली असून गुन्हयाचे तपासात आरोपीने अनेक वर्षापासुन पंढरपूर शहरातील वेगवेगळ्या जीम मध्ये तसेच सध्या कार्यरत असलेल्या जीम मध्ये प्रशिक्षक म्हणून काम करत असताना ब-याच महीला व मुलींची लैंगीक छळवणुक केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महीला व मुलींना गोड बोलून, त्यांची स्तुती करून व त्यांच्याशी मोबाईल द्वारे चॅटींग करून त्यांना अलगदपणे त्यांना खोटया प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे त्यानंतर त्यांना ब्लॅकमेलींग केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी श्रीकांत राजू गायकवाड याचेकडून इतर महीला व मुलींची छळवणुक झाली असल्यास तक्रार देण्यासाठी पुढे यावे, तक्रारदाराचे नांव पत्ता गोपनिय ठेवणेत येईल असे पंढरपूर शहर पोलीस ठाणे तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
ही कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते , अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पंढरपूर शहर चे पोलीस निरीक्षक अरुण पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर निर्भया पथकाचे श्री. प्रशांत भागवत, पोलीस उपनिरीक्षक श्री दत्तात्रय आसबे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नाईक प्रसाद औटी, कॉन्स्टेबल निलेश कांबळे, अरबाज खाटीक, अविनाश रोडगे, नीता डोकडे कुसुम क्षीरसागर यांच्या पथकाने केली आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा