डोक्यावर महापुरुषांची चित्रे करून घेण्याची तरुणाई मध्ये क्रेझ
शिवशाही न्यूज विशेष
कोणताही कलाकार आपल्या कलेचे प्रदर्शन करण्याची संधी शोधत असतो. आणि त्याला संधी मिळाली की त्याच्या कलेचा आविष्कार करत असतो. चित्र काढणे ही एक अशी कला आहे, जी सर्वांना साध्य होत नाही. त्याचप्रमाणे केशरचना करणे हि सुद्धा एक कला आहे. पंढरपूरचा एक सलून व्यवसाईक कलाकार आहे, ज्याने या दोन्ही कलांचा संगम केला आहे. तुकाराम चव्हाण यांनी आपल्या सलूनमध्ये लोकांच्या डोक्यावर विविध प्रकारची चित्र कोरण्याची कला आत्मसात केली असून, सध्या तरुणाईमध्ये त्याची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अशा विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त तरुण मुलं आपल्या लाडक्या महापुरुषांचे चित्र डोक्यावर कोरून घेण्यासाठी तुकाराम यांच्याकडे येतात. त्याच प्रमाणे क्रीडाप्रेमी सुधा आपल्या डोक्यावर फुटबॉल, क्रिकेट या संदर्भातील चित्र कोरून घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसते. इतकच नाही तर काहीजण कॅमेरा, रिक्षा अशा आपल्या व्यवसायाची चित्रे सुद्धा डोक्यावर कोरून घेतात.
11 एप्रिल महात्मा फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्त आता तरुण मुले डोक्यावर महात्मा फुले यांचे चित्र कोरून घेत आहेत. महापुरुषांना अभिवादन करण्याचा हा नवीन ट्रेंड सध्या तरुणांमध्ये चांगलाच लोकप्रिय होत आहे. त्यामुळे डोक्यावर केस कापून त्यात चित्र कोरण्याची कला अवगत असलेले तुकाराम चव्हाण हे सुद्धा सध्या तरुणाईमध्ये चर्चेचा विषय बनले असून, त्यांच्या या कलेचे सुद्धा कौतुक होत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा