पत्नीचा विरह सहन न झाल्याने पतीने घेतला गळफास
शिवशाही वृत्तसेवा पिंपरी -चिंचवड
पिंपरी येथील नवविवाहित प्रेमी जोडप्याने एकापाठोपाठ एक आत्महत्या केल्याने, परिसरातील वातावरण शोकमग्न झाले आहे. अवघ्या पाच महिन्यापूर्वी प्रेम विवाह केलेल्या या जोडप्याने, चार दिवसांच्या फरकाने आत्महत्या केल्याने, त्यांचे नातेवाईक व मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.
अक्षय अंबिलवादे आणि अश्विनी जगताप हे दोघेही पिंपरीच्या डांगे चौक परिसरातील गणेश नगर येथे लहानाचे मोठे झाले. त्यांची लहानपणापासूनची मैत्री तारुण्यात आल्यावर प्रेमात बदलली, आणि 29 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी थाटात प्रेमविवाह केला होता. मात्र अवघ्या पाच महिन्यात त्यांचा सुखी संसार संपुष्टात आला. रविवारी 10 मार्च रोजी अश्विनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे अक्षय दुःखात बुडून गेला होता. त्याचे मित्र व कुटुंबीय त्याला सावरण्याचा प्रयत्न करत होते. परंतु पत्नीचा विरह सहन न झाल्याने अक्षयनेही, पत्नीच्या मृत्यूनंतर तिसऱ्याच दिवशी, बुधवार दिनांक 14 मार्च रोजी गळफास घेऊन मृत्यू जवळ केला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय अंबिलवादे Akshay Ambilwade (वय 25 रा. गणेशनगर, डांगे चौक) आणि अश्विनी जगतापअअंबिलवादे Ashwini Jagtap Ambilwade (वय 25) हे दोघे डांगे चौकातील (Dange Chowk) गणेशनगर येथे लहानाचे मोठे झाले. दोघांनीही खिंवसरा पाटील मराठी शाळेत (Khinvasara Patil in Marathi school) दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध (Love Affair) निर्माण झाले. त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. दोघांनी घरच्यांना विश्वासात घेऊन 29 नोव्हेंबर 2021 रोजी प्रेमविवाह केला. अक्षयला सराफाच्या दुकानात काम मिळाल्यानंतर ते दोघे चिंचवड येथे राहू लागले. दरम्यान, अश्विनीने राहत्या घरात रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आयुष्यभर एकत्र राहण्याचे एकमेकांना वचन दिल्यानंतर अश्विनीने अचानक साथ, सोडल्याने अक्षय पूर्णपणे खचला होता.
अश्विनीचा अंत्यविधी झाल्यानंतर तो आई-वडिलांसोबत डांगे चौकात आला होता. तो आपल्या जीवाचे बरेवाईट करून घेईल याची कल्पना त्याच्या मित्रांना होती. त्यामुळे त्याचे मित्र रात्रभर त्याच्याजवळ बसून होते.आज सकाळी मित्र जघोळीसाठी आपापल्या घरी गेल्यानंतर अक्षयने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेम विवाहानंतर, केवळ पाच महिन्यातच प्रेमी जोडप्याचा दुर्देवी अंत झाल्याने परिसरात शोकमग्न वातावरण तयार झाले आहे. त्यांचे मित्र व कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा