maharashtra day, workers day, shivshahi news,

समाजसेवक नितीन काळे यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या भिमजयंतीच्या स्वागताध्यक्षपदी निवड

डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक डि राज सर्वगोड यांच्या हस्ते सत्कार 

dr. babasaheb ambedkar pratishthan, bhimjayanti, pandharpur, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या स्वागताध्यक्ष नितीन काळे यांची निवड शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे सर्वानुमते करण्यात आली. निवडीचे पत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डि राज सर्वगोड साहेब यांच्या हस्ते सत्कार करुन देण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात सामाजिक उपक्रम घेऊन पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने साजरी केली जाते. डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे काम हे आदर्श घेण्यासारखे असुन महाराष्ट्र भर प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंढरपूर नगरपालिकेचे कर्तव्य दक्ष नगरसेवक डि राज सर्वगोड गोरगरीब जनतेला मदत करत आहेत. आणि यावर्षीच्या जयंतीच्या स्वागताध्यक्षपदी भाई नितीन काळे यांची एकमताने निवड करण्यात आली. नितीन काळे यांचे सामाजिक काम पाहुण ही जबाबदारी देण्यात आली आहे असे नगरसेवक डि राज सर्वगोड साहेब यांनी सांगितले. 

नितीन काळे यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या स्वागताध्यक्ष पदि निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरांतुन कौतुकांचा वर्षाव होत आहे. व नितीन काळे यांनीही असेही सांगितले कि माझ्यावर खुप चांगली जबाबदारी अध्यक्ष डि राज सर्वगोड साहेब यांनी सोपावली आहे ती यशस्वीपणे पार पाडेल व यावर्षीची डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती ही सामाजिक उपक्रम घेऊन आम्ही साजरी करू व एक आदर्श निर्माण करून देऊ असेही नितीन काळे यांनी सांगितले. या जयंतीच्या निमित्ताने पुरस्कार वितरण सोहळ्याचेही सालाबादप्रमाणे यंदाही उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे असेही डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डि राज सर्वगोड साहेब यांनी सांगितले.यावेळी अध्यक्षपदी सुरेश बापु नवले व अनेक जणांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या. यावेळी निवडीच्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय सुदाम गायकवाड सर डि राज सर्वगोड साहेब दिपक आबा चंदनशिवे सल्लागार राजेंद्र कुमार बुध्याळ सर मोरे साहेब व अनेक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !