काय आहे घटनाक्रम
- पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली होती.
- आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या जन्माला येणार नाही असा व्हिडिओ सुरज ने फेसबुक वर टाकला होता.
- शेतकऱ्यांचे वीज पुरवठा अनियमित किंवा खंडित करणे हे आत्महत्येचे कारण असल्याचे बोलले जात आहे.
- महा विकास आघाडीच्या एकाही नेत्याने या घटनेची दखल घेतली नाही.
- सुरजच्या कुटुंबियांचे सांत्वन केले नाही किंवा कोणतीही मदत दिली नाही.
..............................................................
सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर भाजपाचे बोंबाबोंब
शिवशाही वृत्तसेवा, इंदापूर
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची विज बंद केली आहे त्यामुळे तोडणीस आलेली फळपिके इतर सर्व पिके पाणी असताना सुद्धा जळून जात आहेत ऐन उन्हाळ्यामध्ये महा विकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उद्रेक आहे अनेक शेतकऱ्यांची पोर रस्त्यावर ती लढत आहेत वीज वितरण कंपनी वीज उपकेंद्र तूनच वीज बंद करीत आहेत शेतकर्या कडे पैसा नसताना सुद्धा धमकावून वसुली चालू आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे अशातच सधन समजला जाणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील तरुण शेतकरी सुरज जाधव याने मोबाईल वर व्हिडिओ करून पुन्हा शेतकर्याच्या घरी जन्माला येणार नाही अशी आर्त हाक देत आत्महत्या केली होती त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत असताना पालकमंत्री म्हणून दत्तात्रय मामा भरणे यांची जबाबदारी असताना ते या घटनेकडे गांभीर्याने पाहत नाहीत किंवा साधी भेट देऊन सांत्वन करण्याचे धारिष्ट ही त्यांनी दाखवले नाही.
आज सोलापूर जिल्ह्यामध्ये दत्ता मामा भरणे यांनी अनेक उद्घाटनाला हजेरी लावली कार्यकर्त्याच्या घरी चहापाण्याला हजेरी लावली परंतु या कुटुंबाला भेट द्यायला दत्ता मामा भरणे यांना वेळ मिळाला नाही भाजपा किसान मोर्चाच्या वतीने पालक मंत्री महोदय यांना जाग यावी म्हणून व त्या कुटुंबाला मदत करावी व सोलापूर जिल्ह्यातील बंद केलेली विज तात्काळ चालू करावी म्हणुन त्यांच्या इंदापूर येथील निवासस्थानावर सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य मोर्चा काढून त्या ठिकाणी सुरज जाधव या तरुणाला श्रद्धांजली वाहिली व सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या तात्काळ सरकारनं मदत नाही केल्यास व सोलापूर जिल्ह्यातील वीज तोडणी आदेश रद्द नाही केल्यास मयत सुरज जाधव यांचा दहाव्या चा कार्यक्रम दत्ता मामांच्या घरासमोरच करणार असा इशारा माऊली हळणवर यांनी दिला
पोलिसांनी यावेळी मंत्रीमहोदयांच्या घरापासून तीन किलोमीटरवर आडवले परंतु शेतकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते पोलिसांचा विरोध झुगारला पोलिसांशी झटापट करत आंदोलन करते पालकमंत्र्यांच्या घरासमोरच पोहोचले व ठिय्या मांडून निषेध व्यक्त करीत होते त्यामुळे तेथील वातावरण काही काळ गंभीर झाले होते मंत्री महोदय या कडुन आंदोलनकर्त्यांना निरोप देण्यात आला त्यांच्या पीए कडे निवेदन द्यावे. परंतु एवढा गंभीर विषय असताना पालकमंत्र्यांना वेळ नाही म्हणून त्यांच्या गेट च्या भिंतीवरती च निवेदन चिटकवण्यात आले भिगवन चे पोलीस निरीक्षक पवारसो,व पोलीस उपनिरीक्षक खंदारे सो व पोलिसांनी त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी सोलापूर चे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख भाजप किसान मोर्चाचे माऊली भाऊ हळणवर लक्ष्मणराव धनवडे बाळासाहेब सलगर गणेश चिवटे भास्करराव कसगावडे शशिकांत चव्हाण अक्षय वाडकर जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष यांचेसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा