आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गुंजेगाव ते महमदाबाद (शे) रस्त्यावर कॅनॉल क्रॉसिंगवर पूल बांधणीस महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग उपसचिव वैजनाथ चिल्ले यांनी मान्यता दिली आहे. अशी माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
गुंजेगाव ते महमदाबाद (शे) रस्त्यावर कॅनॉल क्रॉसिंगवर पूल बांधणेस मिळणेबाबत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, सिंचन भवन पुणे यांना १६ सप्टेंबर २०२० रोजी प्रस्ताव पाठविला होता.सदर प्रस्ताव सादर केल्यानंतर पूल उभारणीस गती प्राप्त व्हावी यासाठी येथील नागरिकांनी सदर पूल मागणी बांधणीचा प्रश्न मार्गी लागावा आ. समाधान आवताडे यांच्या माध्यमातून रेटा लावला होता.
पाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य व शाखा कालव्यास ये - जा करणाऱ्या रस्ते पूलामधील अंतर २ मैल म्हणजेच ३.२० कि. मी. निर्धारीत केले आहे. सदर मापदंड तत्कालीन सन १९६१ या वर्षातील रस्ते व त्यांचे मानके भौगोलिक व सामाजिक परिस्थितीस जवळपास ५० वर्षांनंतर बदललेल्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि लाभधारक शेतकऱ्यांना कालसुसंगत पायाभूत सुविधा देणेसाठी तसेच नागरी वसाहतीमुळे रहदारीची वाढ झालेली आहे. त्यामुळे वर नमूद केलेले अतिरिक्त पूलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. अशी मागणी आ. समाधान आवताडे यांनी संबंधित विभागाकडे पत्राद्वारे केली होती.
जलसंपदा खात्यातील संबंधित विभागाने विषय संदर्भाधीन पत्रान्वये प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने ३ कि.मी. पूल बांधणी अंतर निकष शिथिल करून व स्थानिक दळणवळणाची गरज आणि व्यापकता या बाबी लक्षात घेऊन गुंजेगाव ते महमदाबाद (शे) रस्त्यावर कॅनॉल क्रॉसिंगवर पूल बांधणीच्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याचे कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा - खोरे विकास महामंडळ पुणे यांना आदेशीत केले आहे. अशा माहितीचे पत्र आ. समाधान आवताडे यांच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा