वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे खर्डी परिसरातील शेतकरी संतप्त
शिवशाही न्यूज खर्डी प्रतिनिधी
खर्डी तालुका पंढरपूर येथे शेटफळ रोडला महावितरणचे सबस्टेशन आहे. कालपासून महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची लाईट अचानक दोन तास केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती मध्ये असणारे पिके जळू लागली आहेत. आज खर्डी गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन महावितरणच्या व सरकारच्या विरोधात महावितरण कार्यालयासमोर मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया सरकार विरोधात व्यक्त केल्या. शेतकऱ्यांचा विज पुरवठा सुरू केला नाही तर आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका शेतकर्यांनी घेतली. शेवटी अधिकाऱ्यांनी दोन दिवस विज पुरवठा सुरू करतो परंतु वरिष्ठांच्या आदेशानुसार सोमवारी निर्णय घेतला जाईल असे सांगितले विज पुरवठा सुरू झाल्यानंतरच शेतकरी महावितरणच्या कार्यालयासमोर उठले. यावेळी उपकार्यकारी अभियंता पंढरपूर ग्रामीण पाटील साहेब सहाय्यक अभियंता एन एम नाईकवाडी यांच्याकडे सर्व शेतकऱ्यांनी निवेदन दिले. आणि वीज बिल भरण्याकरता मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य सरकारकडे व विज वितरण कंपनीकडे करण्यात आली.
या आंदोलनावेळी पाच सहा तरुण शेतकऱ्यांनी स्वतःला सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयात कोंडून घेतले व जोपर्यंत विज पुरवठा सुरू करत नाही तोपर्यंत आम्ही दरवाजा उघडणार नाही अशी भूमिका घेतली शेवटी अधिकाऱ्यांना वीज पुरवठा सुरु करावा लागला.
वीजबिल वसुलीचे आदेश सरकारने दिले आहेत. बिल भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही. तुमच्या मागण्या आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कळवू असे उपकार्यकारी अभियंता ग्रामीण पंढरपूर पाटील साहेब यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा