maharashtra day, workers day, shivshahi news,

राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते माननीय श्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपुर येथे मिष्ठान्न भोजन वृक्षरोपण व नूतन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान

indian national congress, minister balasaheb thorat, birthday, pandharpur, shivshahi news,

प्रतिनिधी  शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर

आज दिनांक रोजी८/२/२२ राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते मा.श्री.बाळासाहेब थोरात ( balasaheb thorat ) यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस चे माजी उपाध्यक्ष श्री.गणेश नंनवरे यांनी मातोश्री वृद्धाश्रम येथे वयो वृद्धांना मिष्ठान्न भोजन ठेवण्यात आले तसेच जिल्ह्यातील काँग्रेस ( congress ) कमिटी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार ठेवण्यात आला व तसेच वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मा.सुमितजी भोसले यांचे हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.या मध्ये वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष साधना ताई उगले,जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नागेश जी गंगेकर, शांतिनाथ दादा बागल, जिल्हा सरचिटणीस किशोर जाधव, जिल्हा सचिव अमर सूर्यवंशी, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण जवळेकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अमरजित पाटील, वरिष्ठ तालुका उपाध्यक्ष राहुल पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेश भादुले, इंटक काँग्रेस सेक्रेटरी महावीर जाधव आदींचा सत्कार करण्यात आला.

या वेळी बोलताना प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस श्री.सुमित भोसले यांनी मा.श्री.बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या वाईट काळामध्ये सुद्धा काँग्रेस च्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांना ताकत देऊन काँग्रेस तळा गळातून मजबूत केली,नकारात्मक काळात काँग्रेस सक्रिय कार्यकर्त्यांच्या पंखामधे सकारात्मक ऊर्जा बल दिल्या मुळे आहे काँग्रेस राज्यात उंच भरारी घेऊ शकली आहे,त्याचे प्रतीक म्हणून आज महविकास आघाडीच्या रूपाने यशस्वी भरारी घेतलेली आहे.तसेच सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.श्री धवल दादा मोहिते पाटील आणि युवकांचे प्रेरणास्थान आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली

येणाऱ्या काळात जास्तीत जास्त युवकांना सोलापूर जिल्ह्यातून संधी दिली जाणार तसेच कार्यक्रमाचे आयोजक श्री गणेश ननवरे यांच्या कामाबाबत शाबासकीची थाप त्यांना कार्यक्रमात दिली या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.किरणराज घोडके तर कार्यक्रमाची प्रस्तावना कार्यक्रमाचे आयोजक श्री गणेश ननवरे तसेच कार्यक्रमाचे आभार श्री.रामेश्वर साळुंखे यांनी व्यक्त केले.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !