गळीत हंगाम 2021-22 मध्ये उत्पादित झालेल्या 3 लाख 3 हजार तीनशे 33 व्या साखर पोत्याचे पुजन
शिवशाही वृत्तसेवा भाळवणी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संस्थापक सहकार शिरोमणी वसंतराव(दादा) काळे यांच्या 78 व्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे पुजन कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी स्व्.वसंतदादा काळे यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित कारखान्याचे चेअरमन मा.श्री.कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कर्यस्थळावर दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह, कुस्त्या, मोफत सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा, सर्वरोग निदान व रक्तदान शिबिर, इ. विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. मात्र मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे शासनाचे निर्बधांमुळे सदरचे कार्यक्रम यंदा घेता आले नसल्याचे सांगितले. तसेच कारखान्याचे संस्थापक, स्व्.वसंतराव (दादा) काळे यांच्या 20 व्या पुण्यतिथी निमित्त कारखाना कार्यस्थळावर बुधवार दि.09/02/22 रोजी सकाळी 9 वा. गळीत हंगाम 2021-22 मध्ये उत्पादित झालेल्या 3 लाख 3 हजार तीनशे 33 व्या साखर पोत्याचे पुजन राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम (काका) साठे यांचे शुभहस्ते करण्यात येणार असून, प्रसिध्द् किर्तनकार ह.भ.प.मच्छिंद्र महाराज कावडे यांचे किर्तनाचा व दु.12.00 वा पुष्पवृष्टीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, तदनंतर येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देवुन, परिसरातील सर्व दादाप्रेमींनी बुधवार दि.09/02/2022 रोजी सकाळी 9.00 वा. कारखाना कार्यस्थळावर सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे असेही सांगितले.
यावेळी कारखान्याचे डेप्यु.जनरल मॅनेजर के.आर.कदम, चिफ अकौंटंट बी.एस. सोनवले, एन.व्ही. कौलगे, मुख्य शेती अधिकारी अे.व्ही. गुळुमकर, विविध खात्याचे खातेप्रमुख, उपखातेप्रमुख कर्मचारी व सभासद शेतकरी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा