संवाद 'ती'च्या आरोग्या साठीचा
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूर शहरतील अनुसूचित जाती जमाती व भटक्या जमाती मधील (पारधी )वस्ती,प्रभाग क्रमांक 13,विसावा, इसबावी येथे सुवर्ण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून सर्वरोग महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले सुवर्ण फाउंडेशनच्या माध्यमातून आज घेण्यात आले
शिबिराचे उद्घाटन अनुसूचित जाती जमातीतील (पारधी) समाजातील गरीब महिलेच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. वान आरोग्याचा या अभियान अंतर्गत सर्व महिलांना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.
सुवर्ण फाउंडेशनच्या माध्यमातून आज सर्व महिला भगिनींची सर्व रक्त तपासणी केली व मासिक पाळी स्वच्छता व मार्गदर्शन केले सुवर्ण फाऊंडेशनच्या माध्यमातून तळागाळातील सर्व महिलांच्या कायम पाठीशी उभा राहनारसर्व शिबिरार्थींना गोळ्या इंजेक्शन टॉनिक हे गोळ्या औषध देण्यात सुवर्णा ताई बागल यांच्या स्वखर्चातून करण्यात आले तसेच गर्भवती महिलांची तपासणी केली महिला व मुलींना सॅनिटरी पॅड चे वाटप केले शिबिरात आलेल्या तीन महिलांचे ऑपरेशन ची सुवर्ण फाउंडेशन च्या वतीने घेतली जबाबदारी यावेळी उपस्थिती म्हणून सुवर्णा ताई बागल डॉ जयंत शिंदे अकलूज, अधटराव सिस्टर, स्वाती सुरवसे यांनी सहकार्य केले. यावेळी प्रशांत शिंदे,साधना राऊत, शुभांगी जाधव,पुजा लवंगकर,अमृता शेळके,फडतरे ताई व,इतर अनेक महिला उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा