विठ्ठलरावजी शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या १५ लाख ५५ हजार ५५५ व्या साखर पोत्यांचे पूजन
शिवशाही वृत्तसेवा टेंभुर्णी ( नवनाथ नांगरे )
"साखर उत्पादनाबरोबरच सहवीज प्रकल्प, इथेनॉल निर्मिती, वाईन निर्मितीबरोबरच ४० ते ५० नवनवी उत्पादने निर्माण होऊन ग्रामीण युवकांना रोजगार निर्मितीसह भविष्यात येथील कारखाने इंधन निर्मितीची मोठ मोठी केंद्रे बनतील" असे मत राज्य साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.
येथील विठ्ठलरावजी शिंदे सह साखर कारखान्याच्या १५ लाख ५५ हजार. ५५५ व्या साखर पोत्यांचे पूजन करताना ते बोलत होते. यावेळी प्रादेशिक सहसंचालक राजेंद्र कुमार दराडे, संचालक रणजीत भैय्या शिंदे, कार्यकारी संचालक संतोष दिग्रजे, जनरल मॅनेजर सुहास यादव सह कारखान्याचे सर्व संचालक व्यासपीठावर उपस्थित होते.
गायकवाड पुढे म्हणाले की "चालू हंगामात साडेबारा लाख हेक्टर ऊस क्षेत्र आहे. पूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये रोजगार हमीचे टैंकर आणि मजूर फिरायचे आज याच जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आणि सर्वाधिक साखर उत्पादन होत आहे . महाराष्ट्रात आज इथेनॉल कोजनरेशन निर्मितीमध्ये 55 हजार कोटी गुंतलेले आहेत. ही गुंतवणूक भविष्यात एक लाख कोटींवर जाईल. आणि इथेनॉल निर्मिती सुमारे दोन कोटी लिटर पर्यंत पोहोचेल. आणि साखर कारखाने ही भविष्यातील मोठी औद्योगिक आणि रोजगाराची निर्मिती केंद्र बनतील. पेट्रोल-डिझेल पुढील तीन-चार वर्षात बंद होईल. त्यामुळे भविष्यात इथेनॉल निर्मिती शिवाय पर्याय उरणार नाही. अर्थातच साखर कारखानदारीला भविष्यात भरभराटीचे चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत असे स्पष्ट मत यावेळी शेखर गायकवाड यांनी मांडले.
यावेळी बबनदादा शिंदे म्हणाले की "पिंपळनेर आणि करकंब युनिट मिळून या वर्षी आम्ही 25 ते 26 लाख टनापर्यंत पोहोचणार असून आत्तापर्यंत 2100 रुपयांची पहिली उचल खंड न पडता सभासदांच्या खात्यावर जमा केली आहे.
भविष्यात हेच पहिल्या उंचीचे बील आम्ही पंधरा ऐवजी दहा दिवसातही देण्यांची व्यवस्था करु, अशी घोषणा यावेळी बबनदादा शिंदे यांनी केली. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामन भाऊ उबाळे, संचालक शिवाजीराव पाटील, वेताळ जाधव,पोपट चव्हाण, विष्णू हुंबे, प्रभाकर कुटे, रमेश येवले पाटील, पोपट गायकवाड, नीलकंठ पाटील, सुरेश बागल, विजय खटके, दगडू घोडकेसह कारखान्याचा सर्व स्टाफ बहुसंख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनरल मॅनेजर सुहास यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश बागल यांनी मानले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा