जागतिक कॅन्सर दिनानिमित्त कॅन्सर फाऊंडेशनचा विधायक उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा टेंभूर्णी (नवनाथ नांंगरे )
कॅन्सर सारख्या महारोगाच्या विरोधात अखंडपणे अग्रेसिव भूमिका बजावणाऱ्या येथील कॅन्सर फाउंडेशन तर्फे जागतिक कॅन्सर दिनाचे औचित्य साधून खास महिलांकरिता गर्भाशयमुख कॅन्सरविरोधी लसीकरण शिबीर टेंभुर्णी येथे थाटात संपन्न झाले.
४ फेब्रुवारी या जागतिक कॅन्सर दिनानिमित्त कॅन्सर फाउंडेशनच्या वतीने टेंभुर्णी शहर परिसरातील गर्भाशयमुख कॅन्सर विरोधी (HPV) लसीकरण शिबीर राबविण्यात आले, या शिबिरामध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ.उमेश झाडबुके व डॉ.पल्लवी झाडबुके यांनी आपल्या झाडबुके बाल रुग्णालयात ९ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींचे लसीकरण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी कॅन्सर फाऊंडेशनच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कॅन्सर फाउंडेशन टेंभुर्णीच्या वतीने गर्भाशयमुख कॅन्सरविरोधी लसीकरण मोहिमेची सुरुवात १ ऑक्टोबर २०२१ पासून करण्यात आली असून महाराष्ट्रात प्रथमच लसीकरणाचे आयोजन कॅन्सर फाउंडेशनने केले आहे.या लसीकरणाने फार मोठी कॅन्सर जागृती मोहीम राबवली जात आहे.कॅन्सर फाऊंडेशनने गेल्या चार वर्षात असे अनेक उपक्रम आत्तापर्यंत राबवले आहेत आणि भविष्यातही कॅन्सर फाउंडेशन वेगवेगळे कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रम राबविणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅन्सर फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश भणगे यांनी केले,यातून या कार्यक्रमाचा उद्देश ही त्यांनीच स्पष्ट केला. ते म्हणाले की "कॅन्सर फाउंडेशन ही सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट असे काम करते. पहिल्या वर्धापन दिनाच्या वेळी टेंभुर्णी व टेंभुर्णी परिसरातून सुमारे 2000 विद्यार्थ्यांच्या मार्फत वेगवेगळ्या शाळेतून कॅन्सरमुक्त रॅलीचे आयोजन केले होते. कॅन्सरवर आधारित पथनाट्यद्वारे चौकाचौकात अभिनय सादर करून त्यातून तीन क्रमांक काढून शाळा कॉलेजला प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह दिली होती. द्वितीय वर्धापन दिनाच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली यामध्ये साडेसातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या माध्यमातून साडेसातशे घरांमध्ये कॅन्सर विरोधी माहिती पोहोचली आहे. सदर स्पर्धा ही ऑनलाईन पद्धतीने प्रश्नमंजुषा पीडीएफ द्वारे राबवली होती तर तृतीय वर्धापन दिनाच्या वेळी गर्भाशयमुख कॅन्सरविरोधी लसीकरण (HPV) शिबिर राबविण्यात आले."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव पवार यांनी केले,तर आभार श्रीकांत लोंढे यांनी मानले. कार्यक्रमातील सर्व मान्यवरांचे व सर्व दैनिक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांचे सत्कार कॅन्सर फाउंडेशनच्या सदस्यांमार्फत करण्यात आले.या कार्यक्रमासाठी,श्रीकांत लोंढे,महेश कोठारी,सुनील महामुनी, महेश बोबडे,संजय अदापुरे,योगेश भणगे,राजेंद्र ढेकणे, किरण पराडे,गणेश खळदकर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॅन्सर फाउंडेशन टेंभुर्णीचे सदस्य महेश कोकीळ,मारुती भानवसे,परमेश्वर खरात,डॉ. विनायक गंभीरे, डॉ. विशाल जाधव, डॉ. ज्योतिराम गव्हाणे,सोमेश्वर तोडकर,प्रदीप तांदळे,तन्वीर मुलाणी,स्वप्नील धोका,संजय तोडकर,ओम स्वामी,आशुतोष क्षीरसागर,किरण कांबळे,गोवर्धन नेवसे,संतोष पानबुडे,वेदांत भणगे,बंडू रावळ,कुमार सरवदे यांनी परिश्रम घेतले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा