शाहू परिवाराने केली चंद्रभागा वाळवंटाची स्वच्छता
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूरात दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात, त्यामुळे चंद्रभागा वाळवंट व नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्यामुळे येथील शाहू परिवाराने माझी शिक्षणमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता मोहिमेमध्ये शिक्षक, महिला, वारकरी शिक्षण संस्थेमधील बाल वारकरी, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. स्वच्छता मोहिमेतील कार्यकर्त्यांनी वाळवंटातील, नदीपात्रातील संपूर्ण घाण काढल्यामुळे वाळवंट चकाचक झाले होते. यावेळी प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की भविष्यात ही चंद्रभागा वाळवंटातील स्वच्छता मोहीम गतिमान करणार असल्याचे त्यांनी सांगितले .यावेळी सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन काळे, मुख्यकार्यकारी अधिकारी अरविंद माळी, नगरसेवक डी राज सर्वगोड, भाजप महिला आघाडी जिल्हा सचिव वंदना पंत, बचत गट अभियानाच्या प्रमुख शितल खटावकर, अनिता कुंभार, ह. भ .प. विष्णु महाराज सुखने, ह.भ.प. विष्णु महाराज सुरवसे (बिड), उपसरपंच काशिलिंग चौगुले ,अण्णा धोत्रे, आदम बागवान, आदीसह बहुसंख्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा