“मानवी जीवनात स्नेहप्राप्ती ही अत्यंत सुखावह” :- रवि वसंत सोनार.
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
(हुसेन मुलाणी)
“मानवी जीवनामध्ये आप्तेष्टांकडून होणारी स्नेहप्राप्ती ही आनंददायी असून त्यामुळे सकारात्मक उर्जा वाढते.” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्षाच्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक उपक्रमाअंतर्गत वसंतपंचमीच्या औचित्याने आयोजित “प्रितकाव्याची वसंतपंचमी” या प्रेमकविता संमेलनात बोलत होते. पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले :- “ प्रत्येक व्यक्तिसाठी इतर अनेक नातेसंबंधांतून मिळणाऱ्या स्नेहापेक्षा जीवन जोडीदाराकडून होणारी प्रीत प्राप्ती ही अत्याधिक सुखावह असते.”
साहित्यिक अंकुश गाजरे आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सविता रवि सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत काव्यसंमेलन रुपात प्रितकाव्याची वसंतपंचमी साजरी करत असताना कवी रवि सोनार यांच्याबरोबरच कवी सचिन कुलकर्णी, कवी सूर्याजी भोसले, कवी गणेश गायकवाड, कवी किरण घोडके तसेच कवयित्री सौ. आशाताई पाटील, कवयित्री सौ. स्मिताताई कवडे यांनी रसिक श्रोत्यांना दिलखुलासपणे हसववणाऱ्या, मंत्रमुग्ध करणाऱ्या सुश्राव्य अशा प्रेमकविता सादर केल्या.
प्रितकाव्याची वसंतपंचमी या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक अंकुश गाजरे हे होते. तर अभिनव अकॅडमीचे मंदार केसकर, उद्योजक दिलीप कवडे, हुसेनभाई मुलाणी, निषाद प्रकाशनच्या प्रकाशिका सौ. मनिषाताई कुलकर्णी, कुछ बातें या युट्यूब चॅनलच्या संचालिका सौ. पूजाताई गायकवाड तसेच लघू उद्योजिका सौ. माधुरीताई भोसले हे मान्यवर उपस्थित होते.
भारतीय परंपरेनुसार आयोजित प्रितकाव्याची वसंतपंचमी हे कविसंमेलन प्रत्येक वर्षी संपन्न व्हायला हवे असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. प्रितकाव्याची वसंतपंचमी हे कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी कवी रवि वसंत सोनार स्नेह परिवाराच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा