maharashtra day, workers day, shivshahi news,

शेळवे येथे आगळा वेगळा राजमाता जिजाऊ साहेबांची जयंती साजरी

 महिलांना बांगड्या चुडे व संक्रांतीचे वाण वाटप

Makar Sankranti, Pandharpur, shivshahi

शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर

 राजमाता जिजाऊसाहेब यांच्या जयंती निमित्त व मकर संक्रात या शुभ मुहूर्तावर खण व चुडे यांचे सर्व महिलांसाठी वाटप कार्यक्रम शेळवे ता. पंढरपुर येथे आयोजन करण्यात आला होता . यावेळी अनेक मान्यवरांनी राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या कार्यांची माहीती महिला वर्गाला सांगितली .याचप्रमाणे येथुन पुढील पिडी जिजाऊच्या नितीमार्गाने घडवावी अशीही विनंती केली

राजमाता जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रचंड प्रेरणा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिजाऊंनी केलेले कार्य पाहता त्यातून एक आदर्श माता समजून येते. माता जिजाऊ हया एक आदर्श कन्या, एक आदर्श पत्नी, एक आदर्श आई या विविध नात्यात वावरताना महाराजांना घडविण्यासाठी त्या मुळीच कमी पडल्या नाहीत. या वेळी प्रथमता राजमाता जिजाऊसाहेब यांच्या प्रतिमेचे सर्व महिलांच्या हस्ते पुजन करण्यात आले .यावेळी आलेल्या सर्व महिलांचा हळदी -कुंकु कार्यक्रम करण्यात आला .यावेळी शेळवे ग्रामपंचायत सदस्या इदुबाई मारुती गाजरे यांनी आलेल्या १२५ महिलांना मकर संक्रातीचा खण व चुडा यांचे वाटप केले. 

यावेळी महिला सोबत आलेल्या सर्व लहान मुलांनाही खावु वाटप करण्यात आले.                                     सदर कार्यक्रम सर्व महिलांनीच मिळुन पार पाडला यावेळी वयोवृद्ध महिलांना आदराचे स्थान देऊन राजमाता जिजाऊच्या प्रतिमेचे पुजन केले.                      या कार्यक्रमाचे आयोजन जय मल्हार महाविकास आघाडी शेळवे यांनी शेळवे येथील खंडोबा मंदिर येथे केले होते.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !