maharashtra day, workers day, shivshahi news,

धावत्या मोटारसायकलवर बिबट्याने केला हल्ला

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला जखमी

Tiger attack, old lady injured, junnar, Pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा पुणे

पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात बिबट्याचे हल्ले 

पुणे जिल्ह्यातील बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. जुन्नर तालुक्यातील दत्तात्रय शिंदे आणि त्यांच्या पत्नी हौसाबाई शिंदे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. जुन्नर जवळील बोरी बुद्रुक येथील सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ बाईक वरून हे शिंदे दांपत्यास जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. प्रसंगावधान दाखवत दत्तात्रय शिंदे यांनी बिबट्याने हल्ला केल्यानंतर सुद्धा बाईक न थांबवता शिताफीने वेगात पुढे नेली. मात्र यादरम्यान गाडीवर मागे बसलेल्या हौसाबाई शिंदे यांच्या पायाला बिबट्याचा पंजा लागल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या. हा बिबट्या उसामध्ये दबा धरून बसला होता.

जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत

जुन्नर तालुक्यात बिबट्याचे प्रमाण वाढले असून बहुतांश ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. एवढेच नव्हे तर आता त्यांनी माणसांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. जुन्नर तालुक्यात त्यामुळे रात्रीच्या वेळी शेताला पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये, तसेच शेतामध्ये वस्तीवर राहणाऱ्या लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !