जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा व सामूहिक राष्ट्रगीत गायन
शिवशाही वृत्तसेवा भोसे
१ जानेवारी २०२२ रोजी नववर्षाचे औचित्य साधून, जिल्हा परिषद भोसे प्रभागातील, भोसे ग्रामपंचायत यांच्या वतिने, सामुहिक राष्ट्रगीत गायन, व जिल्हा परिषद मुलींची शाळा भोसे इमारतीचा नूतनीकरणाच्या उद्घाटन सोहळा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पंढरपूर अंतर्गत स्थापित मौजे भोसे गावच्या स्वयं सहायता समूहांना विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा भोसे यांचे मार्फत १६ स्वयं सहायता समूहांना सोळा लाख कर्ज मंजुरीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले
त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे या ठिकाणी प्रभाग स्तरिय परसबाग डेमो करण्यात आला होता त्यास माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट देऊन पाहणी केली व मार्गदर्शनही केले यावेळी गटविकास अधिकारी श्री. प्रशांत काळे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेंद्र पिसे, यांची प्रमुख उपस्थिती होती तर तालुका अभियान व्यवस्थापक देवल परचंडे तालुका व्यवस्थापक गजानन सुतार, प्रभाग समन्वयक समाधान खूपसे प्रभाग समन्वयक वैभव चव्हाण कृषी व्यवस्थापक दीपक कदम, स्वयंसहायता समूहातील महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
Great
ReplyDelete