maharashtra day, workers day, shivshahi news,

राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने प्रा अनिता मोहिते यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

योगाचे क्रांतिकारक कार्य व शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श कार्य यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे

Ideal teachers award, Anita Mohite, Barshi, vishwagami patrakar mahasangh, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा बार्शी

               भारत सरकार मान्यताप्राप्त राष्ट्रीय विश्वगामी बहुउद्देशीय पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या आदेशानुसार अनिताजी मोहिते यांना योगाचे क्रांतिकारक कार्य व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला प्रसंगी सोलापूर जिल्हा राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ यांच्या हस्ते निवड पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

                 प्राध्यापक अनिता मोहिते यांनी योगाचं मार्गदर्शन करून त्यांना हजारो नागरिकांना विद्यार्थ्यांना विनामूल्य शरीर संपत्ती मिळवून दिली व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य विद्यार्थ्यांबरोबर योगाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले इतर कार्याचा आढावा घेऊन सोलापूर जिल्हा राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने योगाचे क्रांतिकारक कार्य व आदर्श शिक्षिका पुरस्कार निवड पत्र देऊन जाहीर करण्यात आला प्राध्यापक अनिता मोहिते बार्शी तालुक्यातील शेळगाव येथे त्या शेळगाव जुनियर कॉलेज शेळगाव येथे आदर्श शिक्षिका म्हणून काम करतात त्यांना यादी सावित्रीबाई फुले पुरस्कार व इतर पुरस्कार पण मिळाले आहेत यावेळी 

                  या निवडीबद्दल राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक महासंघाचे मार्गदर्शक समता सूर्य न्यूज चॅनलचे संपादक अंकुश आतकर, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघाचे प्रसिद्धीप्रमुख वसंत कांबळे, पत्रकार सुहास कांबळे, सोलापूर जिल्हा सल्लागार दत्तात्रय ननवरे, जिल्हा संपर्कप्रमुख हरिश्चंद्र गाडेकर, पंढरपूर तालुका अध्यक्ष संजय मुळे, माढा तालुका अध्यक्ष दत्तात्रय देवकते, उपाध्यक्ष नितीन कांबळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या निवडीबद्दल सोलापूर जिल्ह्याबरोबर पूर्ण महाराष्ट्रात प्राअनिता मोहिते यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !