खासदार सुप्रिया सुळे यांनी केले शिल्पकार सुप्रिया शिंदे यांचे कौतुक
राजकारणातील धुरंदर म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, यांचा पूर्णाकृती पुतळा आता साकारला जातो आहे. पुणे येथील आंबेगावच्या शिल्पकार, सुप्रिया शिंदे, यांनी हा पुतळा साकारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार्या, त्या एकमेव महिला शिल्पकार आहेत. सुप्रिया शिंदे यांचा आंबेगाव येथे स्टुडिओ असून, अनेक राष्ट्रपुरुषांचे, तसेच कलात्मक पुतळ्यांच्या, सुंदर कलाकृती त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. आता त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, शरद पवार यांचा, पूर्णाकृती पुतळा साकारला आहे. हा पुतळा इतका हुबेहूब आहे, की साहेब आपल्यासमोरच उभे आहेत, असे वाटते. सध्या सर्वत्र या पुतळ्याचीच चर्चा असून, खासदार सुप्रिया सुळे, यांनी सुद्धा, शिल्पकार सुप्रिया शिंदे, यांच्या स्टुडिओला भेट देऊन, साहेबांचा पुतळा पाहिला, आणि सुप्रिया शिंदे यांचे कौतुक केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा