maharashtra day, workers day, shivshahi news,

गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला सांगोला कारखाना लवकर सुरू होणार - अभिजीत पाटील

११कामगारांच्या हस्ते (सांगोला कारखाना) धाराशिव कारखाना युनिट ४ चे मिल रोलर पूजन संपन्न.

sangola sakhar karkhana, dharashiv sakhar, abhijit patil, pandharpur
सांगोला कारखान्याचे मिल रोलर पूजन करताना कामगार आणि चेअरमन अभिजित पाटील 

प्रतिनिधी- सांगोला

धाराशिव साखर कारखाना युनिट-४ सांगोला साखर कारखाना प्रथम गळीत हंगाम सन २०२१-२०२२ चा "मिल रोलर पूजन" धाराशिव साखर कारखाना युनिट४च्या ११ कामगारांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या उपस्थित पार पडले. 

गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला हा कारखाना सुरू होत असल्याने शेतकऱ्यांत, कामगारांत आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. कर्मचाऱ्यांनी रात्र दिवस मेहनत करून कारखाना सुस्थितीत आणला. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा पावसाचे हि प्रमाण सगळीकडे चांगल्याप्रकारे आहे. या हंगामात लवकर कारखाना सुरू करून भागातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपास आणू. पाऊसकाळ चांगला असल्याने शेतकऱ्यांनी देखील जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे अवाहन धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले. 

sangola sakhar karkhana, dharashiv sakhar, abhijit patil, pandharpur
सांगोला कारखान्याचे मिल रोलर पूजन प्रसंगी चेअरमन अभिजित पाटील आणि मान्यवर 

याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक संतोष कांबळे, सुरेश सावंत, रणजीत भोसले, जयंत सलगर, दिनेश शिळ्ळे, सुहास शिंदे यासह जेष्ठ संचालक शहाजी नलवडे, तुकाराम जाधव, विश्वंभर चव्हाण, संजय मेटकरी तसेच अधिकारी वर्ग, कर्मचारी, जेष्ठ मंडळी, मित्र परिवार यांच्या उपस्थित पार पडला.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !