पंढरपूर येथील शासकीय विश्राम ग्रह येथे पत्रकार सुरक्षा समितीची बैठक
पत्रकार सुरक्षा समिती - तालुका अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार प्रशांत माळवदे |
प्रतिनिधी - पंढरपूर
दिनांक 5 आक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार सुरक्षा समिती बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी प्रदेश अध्यक्ष यशवन्त पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते . ही बैठक राज्य सचिव डॉ आशिष्कुमार सुना यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असून यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रकार सुरक्षा समिती ही पत्रकारांच्या विविध प्रश्नावर काम करीत आहे ,गेली नऊ वर्ष अविरत काम चालू आहे पत्रकाराणवर वारंवार होणारे हल्ले असोत अथवा यूट्यूब आणि पोर्टल च्या माध्यमातून पत्रकारिता करणारे पत्रकार बांधवांना शासकीय जाहिराती मिळणे विषयी अथवा पत्रकारांना विमा संरक्षण मिळावे अश्या विविध मागण्या राज्य सरकारला आणि राज्याचे महामहिम राज्यपाल यांना निवेदन देऊन मागणी केली आहे अश्या विविध प्रश्नासाठी ते शासन दरबारी पर्यतनशील असून अनेक प्रश्न सोडवून पत्रकारांना न्याय देत असतात.या बैठकी च्या वेळी बोलतांना ते म्हणाले की पत्रकारिता कशी असावी आणि त्यासाठी संघटन किती महत्वाचे आहे याबाबत मा मार्गर्दशन केलें या बैठकीमध्ये सर्व पत्रकार बांधवांना ओळख पत्र देऊन सन्मान करण्यात आला सदर बैठकीस ग्रामीण व शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते पत्रकार दत्ता पाटील, चैतन्य उत्पात , विश्वास पाटील, रविंद्र शेवडे, सचिन कुलकर्णी , बाहुबली जैन, कबीर देवकुळे , अमर कांबळे, प्रशांत माळवदे प्रा दत्तात्रय खिलारे,बिरुदेव केंगार , महादेव भोसले सर, विजय कुमार मोटे, विनोद पोतदार, आण्णा धोत्रे सचिन माने प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, राज्य सचिव डॉ आशिष कुमार सुना, जिल्हाध्यक्ष रामचंद्र सरवदे, सोलापूरचे विठ्ठलराव वठारे, बाबा नागनाथ गणपा, महिला प्रतिनिधी प्रा सुरेखा भालेराव नागटिळक आदीजन उपस्थित होते
शेवटी आद्यक्षीय मनोगतात राज्य सचिव डॉ सुना यांनी विशेष मागर्दशन करून ही संघटना राज्यापूर्ती मर्यादित न ठेवता देशपातळीवर गेली पाहिजे गुजरात मधील आणि राज्यस्थान आणि उडीसा मध्ये पत्रकारांवर झालेल्या अन्यायास पत्रकार सुरक्षा समिती केलेल्या मदतीचा आणि पत्रकारितेच्या संघटन कौशल्या विषयी विशेष मागर्दशन केले शेवटी आभार नूतन तालुका अद्यक्ष प्रशांत मालवदे यांनी मानले तर रविंद्र शेवडे यांनी सूत्रसंचालन केले मान्यवर पाहुण्या समवेत नूतन तालुका अध्यक्षांचा शाल फेटा गुलाबपुष्प देऊन जिल्ह्दयक्ष यांच्या हस्ते व डीएस एस चे अध्यक्ष दिलीप देवकुळे याचा ही सत्कार करण्यांत आला
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा