पंढरपूरातून भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ
ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ |
माजी मंत्री व आमदारांसह भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
पंढरपूर - प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या वतीने , ओबीसी आरक्षण त्वरित द्यावे यासाठी ,ओबीसी जागर अभियानाची सुरुवात केली आहे. या ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ, पंढरपूरच्या श्री रुक्मिणी पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन, नामदेव पायरीपासून करण्यात आला.
ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ |
त्यानंतर संत तनपुरे महाराज मठात ओबीसी आरक्षण जागर मेळावा, संपन्न झाला. " महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, त्यामुळे ओबीसींच्या न्याय्य हक्कांवर गदा आली असून,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षण विरोधी आहेत. मराठा आरक्षण , महिलांवरील अत्याचार अशा सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे मात्र भारतीय जनता पक्ष ऑप्बीसींच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून,ओबीसी जागर अभियानाचा जोर एवढा वाढवणार आहोत कि, या सरकारला ओबीसींना न्याय द्यावाच लागेल", असे मत ओबीसी जागर अभियानाचे प्रवर्तक, माजी मंत्री योगेश टिळेकर यांनी व्यक्त केले.
" काँग्रेस नेत्यांच्या डोक्यात रोज नवे किडे वळवळतात त्या किडयांनीच महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण घालवले आहे, परंतु सर्वात जास्त ओबीसी मंत्री करणारा पक्ष भाजपा आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मिटल्याशिवाय महाविकास आघाडी सरकारला झोपू देणार नाही "असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संजय कुठे यांनी केले. आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री हंसराज आहिर , यांनीदेखील ओबीसी जागर अभियानाचा हेतू आणि भूमिका आपल्या मनोगतातून मांडली.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा