maharashtra day, workers day, shivshahi news,

धाराशिव साखर कारखान्याचा बाॅयलर अग्निप्रदिपन उत्सवात संपन्न

१३६रू हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

दिवाळीसाठी १५दिवसाचा पगार बोनस जाहीर

Boiler ignition, Dharashiv Sugar Factory, osmanabad, abhijit patil,dilip dotre
बाॅयलर अग्निप्रदिपन करताना मान्यवर 

नवीन ६७१ ऊस लागवडीस १०० रू भाव जास्त

उस्मानाबाद - प्रतिनिधी

धाराशिव साखर कारखाना लि.चोराखळी १०व्या गळीत हंगामाचा बाॅयलर अग्निप्रदिपन ह.भ.प. श्रीगुरू अनिल महाराज पाटील बाभूळगांवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. बाॅयलर अग्निप्रदिपन पुजेस कारखान्याचे संचालक भागवत चौगुले, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.कविता चौगुले यांच्या हस्ते होमहवन पुजा करण्यात आली. 

याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक सुरेश सावंत, संतोष कांबळे, रणजीत भोसले, विकास काळे, दिपक आदमिले, सुहास शिंदे, सजंय खरात, आदीची उपस्थिती होती. 

ह.भ.प. श्रीगुरू अनिल महाराज पाटील बाभूळगांवकर यांच्या हस्ते अग्निप्रदिपन करण्यात आले. महाराज बोलताना म्हणाले की, कारखान्यातील प्रत्येक कर्मचारी अधिकारी आणि संचालक मंडळ हे निर्व्यसनी असल्याने कारखान्याची उन्नती प्रगती होत आहे. तसेच बोलताना म्हणाले शारीरिक दृष्ट्या निर्व्यसनी तंदुरुस्त ठेवून तसेच पगार वेळेवर करून त्याचे आर्थिकचे बळ देखील जपत आहेत. कर्मचारी हा फक्त नसून तो घरातला एक सदस्याप्रमाणे वाढवण्याचे काम कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून केले जात आहे. त्याच्या वाटचालीस शुभेच्छा देत महाराजांनी आपले शुभेच्छापर भाषण व्यक्त केले. 

यावेळी चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की, १३६ रुपये हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करण्यात येईल.तसेच कर्मचाऱ्यांची हि दिवाळी गोड व्हावी याकरिता दिवाळीसाठी कामगारांना १५ दिवसाचा पगार बोनस म्हणून देण्याचे जाहीर केले.सन२०२२-२२ साठी शेतातील सोयाबीन निघाल्यानंतर नोव्हेंबर मध्ये शेतकऱ्यांनी ६७१जातीचा ऊस जास्तीत जास्त लागवड करून लागवडीपासून बारा महिन्यात गाळपास आणून त्यासाठी प्रोत्साहन पर इतर जातीपेक्षा प्रति टन भाव शंभर रुपये जास्त देण्याचे अवाहन चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले. आणि येणाऱ्या हंगामासाठी कारखान्यातील अधिकारी कर्मचारी, कामगार व शेतकरी सभासद बांधव, तोडणी ठेकेदार यांना बॉयलर अग्निप्रदिपनाच्या शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी चोराखळीचे सरपंच खंडेराव मैदांड, मा.सरपंच बाबा साठे, केजचे सुरेश पाटील, सरपंच चरणेश्वर पाटील, बाबासाहेब पाटील, पंढरपूरचे प्रा.तुकाराम मस्के, पोपट पवार, चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तुकातात्या मोरे, उमेश मोरे, गणेश ननवरे,पोपट घाडगे, महेश जावळे, समीर शेख, रणजीत तनपुरे,  कारखान्याचे जनरल मॅनेजर गायकवाड, प्रवीण बोबडे, शेती अधिकारी गव्हाणे, तांबारे, रवी लिंगे यासह अधिकारी वर्ग, कर्मचारी यांच्या उपस्थित पार पडला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे संचालक दीपक आदमिले यांनी केले.व कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी कार्यक्रमाची सांगता समारोप केला.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !