धाराशिव साखर कारखाना युनिट४ सांगोला कारखान्याचा बाॅयलर अग्निप्रदिपन संपन्न


Dharashiv Sugar Factory, Unit 4 , Sangola Sugar Factory,  Boiler Lighting, abhijit patil, shivshahi news
बाॅयलर अग्निप्रदिपन करताना मान्यवर 

पंढरपूर - प्रतिनिधी

धाराशिव साखर कारखाना,संचलित सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना (युनिट क्र.४) काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला सांगोला साखर कारखाना पंढरपूरचे युवा नेते अभिजीत आबा पाटील यांच्या कडे चालविण्यास असल्याने सुरू होत असून सन२०२१-२२ गळीत हंगामाचा "बाॅयलर अग्निप्रदिपन" ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली महाराज पवार, सोलापूर जिल्ह्याचे मा.आमदार दिपक आबा साळुंखे-पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, युवा नेते सागर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 

यावेळी ह.भ.प.माऊली महाराज यांचे कीर्तन करून बाॅयलर अग्निप्रदिपन सोहळा करण्यात आला. याप्रसंगी होमहवन पूजा पळशी गावचे प्रगतीशील बागायतदार हणमंत पाटील सौ.रतनताई पाटील व पांढरेवाडी गावचे सचिन घाटे व सौ. उर्मिलाताई घाटे या उभयतांच्या हस्ते करण्यात आला. 

यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र ऊसाची लागवडही मोठ्या प्रमाणात झाल्याने सांगोला,पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपास आणू अशी ग्वाही अभिजीत पाटील यांनी दिली. ब्राझील येथे दुष्काळ असल्याने आपल्या येथील साखरेस उठाव आहे. त्यामुळे साखरेला दर चांगल्याप्रकारे असल्याने शेतकऱ्यांस चांगला भाव देणे शक्य होईल अशी घोषणा चेअरमन अभिजीत पाटील यांनी केली. 

याप्रसंगी मा.आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की तीन साखर कारखाने चालविण्याचा दांडगा अनुभव अभिजीत पाटील यांच्याकडे असल्याने कारखान्याची कामे लवकर पुर्ण केली आहेत. कारखानदारीतील डाॅक्टर म्हणून त्याच्याकडे बघितला तर वावगं ठरणार नाही. भागातील शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय देण्याचं मोठे काम केले आहे. पाटील यांच्यामुळे सांगोला व येथील नागरिकांना गतवैभव प्राप्त करून दिले आहे. 

याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक सुरेश सावंत, संतोष कांबळे, रणजीत भोसले, दिपक आदमिले, सुहास शिंदे, सजंय खरात, जयंत सलगर, दिनेश शिळ्ळे यासह सांगोल्याचे चेअरमन विश्वनाथ चव्हाण, संचालक अशोक शिंदे, शहाजी नलवडे, मारुती ढाळे, तुकाराम जाधव पंढरपूर भागातील जेष्ठ मंडळी, मित्र परिवार, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !