तिन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी व्यापाऱ्यांना केले बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
महाराष्ट्र बंदला पंढरपुरात संमिश्र प्रतिसाद |
पंढरपूर - प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ, महाराष्ट्रातील सत्ताधारी महा विकास आघाडीतील, घटक पक्ष असलेल्या, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आणि नॅशनल काँग्रेस यांनी, महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानुसार पंढरपुरात तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी, व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होऊन, बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. पंढरपूर मध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील बहुतेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती, तर चप्पल लाईन, नगरपरिषद, व शहरातील इतर भागातील पेठांमध्ये, बहुतांश ठिकाणी दुकाने सुरू असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला आहे, असेच दिसते. मात्र शहराच्या मध्यवर्ती व दर्शनी भागातील दुकाने बंद असल्यामुळे, महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्यासारखे वाटते. काही ठिकाणी दुकाने बंद, तर काही ठिकाणी चालू, अशी स्थिती असल्याने, बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा