फुले एज्युकेशन तर्फे राज्य महिला आयोगाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रुपालीताई चाकणकर सन्मानित
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचा सन्मान करताना मान्यवर |
शिवशाही वृत्तसेवा पुणे
फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तर्फे रविवार दि.17.10.2021 रोजी दुपारी गौरी पिंगळे आयोजित माळी मराठा वधु वर परिचय मेळाव्यात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रूपालिताई चाकणकर यांचा अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक व गौरी पिंगळे यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे फोटो फ्रेम ,थोर ऐतिहासिक शूर महिला,महात्मा फुले गीत चरीत्र ,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ आणि शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक काका चव्हाण ,रवि चौधरी,बाळासाहेब नवले,बाळासाहेब रायकर ,माजी सभापती प्रभावती भूमकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ,महाराष्ट्र अध्यक्षा मंजिरी धाडगे ,सुरेखा धर्मीष्टे ,सायली वांजळे,सुनीता भगत,उपस्थित होते.
यावेळी रुपालीताई चाकणकर व राष्ट्रसेवा समूहाचे राहुल पोकळे म्हणाले की "वधु वर आणि पालकांनी कुंडली,पत्रिका न पहाता ,मेडिकल तपासणी करून विवाह करावेत त्यामुळे आयुष्याचे जोडीदार नक्कीच चांगले मिळतील सोबत ते जोडीदार कायम एकमेकांनचे विचाराने , एकोपाने कसे नांदतील हे देखील दोन्ही परिवाराने पाहिले पाहिजे" असा मौलिक सल्ला देत "महात्मा फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीने विवाह करावेत कारण हे लग्न कोणताही स्त्री पुरुष लावू शकतो यासाठी ब्राह्मणांची गरजच नाही.यामुळे अंधश्रद्धा ,कर्मकांड व पंचांग याला फाटा देणे सोयीचे होईल ही आधुनिक काळाची गरज आहे",असे देखील म्हंटले.
हा मोफत मेळावा प्रथमच माळी मराठा एकत्र कोव्हिडं नंतर होत असल्याने अनेक मान्यवरांनी आवर्जून भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्यावेळी गौरी पिंगळे यांच्यातर्फे त्या सर्वांचे शाल ,श्रीफळ आणि जास्वानंदीचे फुल झाडे भेट स्वागत करण्यात आले.
याप्रसंगीमाळी समाजाचे 115 वर आणि 52 वधु तसेच मराठा समाजाचे 59 वर आणि 3 वधु असे एकूण 229 जणांनी व पालकांनी कोव्हिडं चे नियम पाळत सहभाग नोंदवला होता.
या मेळाव्याचे स्वागत प्रास्तविक गौरी पिंगळे, सूत्रसंचालन रघुनाथ ढोक आभार प्रदर्शन धनंजय बेनकर यांनी मानले.तर मेळावा यशस्वी करण्यासाठी उजवला कांडपिळे, अनिल निवगुणे, प्रा.सुदाम धाडगे, किशोर भास्कर, दत्ता बनकर,नवनाथ कोद्रे ,मंगल कार्यालयाचे प्रमुख किशोर पोकळे,शैला ढगे व मोलाचे सहकार्य अक्षय पिंगळे ,रोहिणी रासकर,चेतन बेनकर, आकाश ढोक ,कपिल बोरावके यांचे झाले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा