बाबा राम रहीम याला मरेपर्यंत राहावे लागणार जेलमध्येच
बाबा राम रहीमचे संग्रहित छायाचित्र |
शिवशाही वृत्तसेवा चंदिगड
रणजीत सिंग खून प्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा राम रहीम यांच्यासह, अन्य चार अपराधींना न्यायालयाने, सोमवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जसबिर, अवतार, कृष्णलाल, आणि सबदिल, अशी अन्य दोषींची नावे आहेत. पंचकूला येथे सीबीआय न्यायाधीश सुशील गर्ग यांनी दिलेल्या निकालानुसार, राम रहीम याला 31 लाख रुपये दंडही भरावा लागणार आहे. अन्य चौघांना प्रत्येकी पन्नास पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. राम रहीम याला याआधी पत्रकार रामचंद्र छत्रपती, खून प्रकरणातही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. शिवाय दोघा साध्वींच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात राम रहीम मला दहा दहा वर्षाचा कारावास ठोठावण्यात आलेला आहे. निकालानुसार राम रहीमला त्याच्या मृत्यूपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे, असे सोमवारी निकालानंतर सीबीआयचे वकील एच.पी.एस. वर्मा यांनी, माध्यमांना सांगितले.
याआधी विविध खटल्यात सुनावण्यात आलेल्या शिक्षा राम रहीमला एकत्रच भोगायच्या आहेत. मयत रणजीत सिंग यांचा मुलगा जगसीर यांनी न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त केले आहे. राम रहीमला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तर अन्य चौघांना प्रत्यक्ष पंचकूला सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर पंचकूला जिल्हा पोलिसांनी, कलम 144 लागू केले होते. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या जवानांसह, मोठ्या संख्येने पोलीस शहरात तैनात ठेवले होते. सीबीआयच्या वकिलांनी राम-रहिमला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. दुसरीकडे राम रहीम याने आपल्या सामाजिक कार्याचा हवाला देऊन, शिक्षेत सवलत द्यावी अशी मागणी केली होती.
काय आहे रणजीत सिंग खून प्रकरण ?
Baba Ram Rahim and four others were sentenced to life imprisonment, murder and sexual abuse case,
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा