लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई , मोठा भ्रस्टाचार झाला असण्याचीही श्यक्यता
रचनात्मक चित्र |
शिवशाही वृत्तसेवा पुणे
जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून ५ लाख रुपयांची लाच घेतल्यानंतरही आणखी ३ लाखाची मागणी करून १ लाख 90 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपायुक्तांना रंगेहात पकडले.
नितीन चंद्रकांत ढगे (वय 40) असे या उपयुक्तताचे नाव आहे. वानवडी येथील ढगे यांच्या निवासस्थानाजवळ शनिवारी रात्री पाऊणे दहाच्या सुमारास लाचलुचपत विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. ढगे याच्या घराची झडती घेतली असता, तब्बल 1 कोटी 28 लाख 49 हजार रुपयांची रोकड तसेच २ कोटी 81 लाखाहून अधिकची मालमत्ता आढळून आली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात, नितीन ढगे हे उपायुक्त तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आहेत. तक्रारदारांनी पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केला होता. ते प्रमाणपत्र वैध करण्याकरता ढगे याने ८ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी पाच लाख रुपये सप्टेंबर मध्येच त्याला दिले होते. तरीही आणखी तीन लाखांची मागणी केली. तेव्हा तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली तक्रारीची पडताळणी करण्यात आली त्यात ढगे यांनी तडजोड करून दोन लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर तक्रारदार यांना ढगे यांनी पैसे देण्यासाठी वानवडी येथील आपल्या निवासस्थानी जवळ बोलवले होते वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि जात पडताळणी समितीच्या उपायुक्त नितीन ढगे याला अटक करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव सुहास नाडगौडा पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे नितीन ढगे याला रविवारी न्यायालयात हजर केले आरोपीच्या घराच्या झडतीमध्ये १ कोटी 28 लाख पेक्षा अधिक ची रक्कम सापडली असून ती रक्कम त्याच्याकडे कशी आली याचाही तपास लाचलुचपत विभाग करत आहे जात पडताळणी उपायुक्त नितीन ढगे याने आणखी इतर व्यक्तीकडूनही लाच स्वीकारली असण्याची शक्यता यावेळी पोलिसांनी वर्तवली आहे त्यादृष्टीने पोलीस तपास करण्यासाठी सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली आहे त्यांना विक्रमसिंह घोरपडे यांनी सहकार्य केले आहे नितीन ढगे याला सत्र न्यायालयाने 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा