मंगळवेढ्यातील कुस्त्यांच्या जंगी मैदानात पै. नारायण सोलंकर यांना केले चितपट
मंगळवेढा - प्रतिनिधी
मंगळवेढ्याचे सुप्रसिद्ध पैलवान राजेंद्र ओमणे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते. यासाठी एक लाख रुपयाचे अंतिम बक्षीसही ठेवण्यात आले होते. ही अंतिम लढत पै. सिद्धनाथ ओमणे आणि पै. नारायण सोलंकर यांच्यात झाली. सोलापुर डीसीसी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव अवताडे, माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकट भालके, आणि मंगळवेढा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. अटीतटीने आणि डाव-प्रतिडाव आने रंगतदार झालेल्या सामन्यात पै. नारायण सोलंकर यांना पै सिद्धनाथ ओमने यांनी आस्मान दाखवत एक लाख रुपयाचे बक्षीस पटकावले.
मंगळवेढा आठवडा बाजार येथे पार पडलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानाच्यावेळी पंढरपूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस चे अध्यक्ष मारुती वाकडे, तुकाराम कुदळे, नामदेव पडवळे, अनिल इंगळे, बाळासाहेब नागणे, आण्णा ओमणे, रावसाहेब फटे, सागर जाधव, प्रमोद सावंजी आदि मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा