भाला फेक मध्ये पटकावले सुवर्णपदक
भारतासाठी ऑलम्पिक मध्ये अथलेटिक्स प्रकारातले पहिले सुवर्ण
![]() |
niraj chopra tokyo olympics |
नीरज चोपडा ने जिंकले भालाफेकीत सुवर्ण
भारताचा खेळाडू नीरज चोपडा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत बहारदार खेळी केली आहे. करोडो भारतीयांच्या स्वप्नाला त्याने आकार दिला आहे. भारताला ओलंपिक मधले दुसरे आणि अथलेटिक्स मधले पहिले सुवर्णपदक मिळाल्याने, देशभर उत्सव साजरा केला जात आहे. तसेच सर्व भारतीयांकडून नीरज चोपडा याच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह सर्व नेते, खेळाडू, कलाकार, यांनी नीरज चोपडा चे अभिनंदन केले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नीरज चोपडा चे अभिनंदन करून, सहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
नीरज चोपडा ची ओलंपिक कामगिरी
टोकियो ऑलम्पिक मध्ये भालाफेक या खेळात नीरज चोपडा ने चमकदार कामगिरी करत, पहिल्या फेरीमध्ये 87 .03 मीटर भाला फेकून आघाडी मिळवली. दुसऱ्या फेरीत नीरज चोपडाने 87.56 मिटर भाला फेकून ही आघाडी कायम ठेवली. या दोन फेऱ्या नंतर तो मोठ्या फरकाने आघाडीवर राहिला होता, आणि शेवटपर्यंत ही आघाडी त्याने टिकून ठेवली. तिसऱ्या फेरीत 76 . 79 मीटर थ्रो फेकला. चौथ्या आणि पाचव्या फेरीत नीरज चोपडा चार थ्रो फॉऊल झाल्यानंतर, सहाव्या फेरीत दमदार पुनरागमन करत, नीरज चोपडाने 84 मीटर थ्रो केला, आणि टोकियो ऑलम्पिक मध्ये अथलेटिक्स खेळातल्या भारताच्या पहिल्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
हरियाणातल्या छोट्या गावचा आहे नीरज चोपडा
हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातले खांद्रा हे नीरज चोपडा चे मुळगाव आहे. याच लहानशा गावातून आलेला, नीरज चोपडा याला भालाफेक या खेळाची काहीच पार्श्वभूमी नव्हती. गावातील इतर मुलांप्रमाणेच नीरज चोपडा आधी क्रिकेट खेळत होता. 2021 मध्ये पटियाला च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स येथे नीरज चोपडा ने 88 .07 मीटर भाला फेकला होता. 2018 मध्ये आशियाई खेळांमध्ये सुद्धा नीरज चोपडाने 88.06 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले होते. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी, नीरज चोपडा चे अभिनंदन करून, सहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच त्याला क्लासवन दर्जाची नोकरी देणार असल्याचेही जाहीर केले आहे. सध्या नीरज चोपडा भारतीय सैन्याला ज्युनिअर ऑफिसर या पदावर कार्यरत आहे.
पंतप्रधान व राष्ट्रपतींकडून नीरज चोपडा चे अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून नीरज चोपडा चे अभिनंदन केले आहे. "नीरज चोपडा चे सुवर्णपदक कायम लक्षात ठेवले जाईल. टोकियोमध्ये इतिहास रचला गेला आहे. त्याने अतुलनीय खेळ करून सुवर्ण पदक जिंकले आहे. नीरज चोपडा याचे अभिनंदन." असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह, सर्वच केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी आपापल्या सोशल मीडिया वर नीरज चोपडाचे अभिनंदन केले आहे.
तब्बल तेरा वर्षानंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण
अभिनव बिंद्रा याने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविल्यानंतर, तब्बल तेरा वर्षानंतर भारताला, ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. नीरज चोपडा याचे सुवर्णपदक भारताच्या ऑलिम्पिक इतिहासातले दुसरे, तर ॲथलेटिक्स मधले पहिले सुवर्णपदक ठरले आहे. या सुवर्ण पदका मुळे टोकियो ऑलिंपिकमधील भारताच्या पदकांची संख्या 7 इतकी झाली असून, यापूर्वी मीराबाई चानू आणि रविकुमार दहिया यांनी रौप्य पदक तर भारतीय पुरुष हॉकी संघ, पी व्ही सिंधू , लवलीना , आणि बजरंग पुनिया यांनी कांस्य पदक पटकावले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा