मंगळवेढा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून कोकण पूरग्रस्तांना संसारोपयोगी वस्तूची मदत पाठवण्यात आली
![]() |
पूरग्रस्तांना मदत पाठवताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते |
मंगळवेढा - प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते श्री विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री.भगीरथ (दादा) भारत भालके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंगळवेढा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप बुरकुल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस मंगळवेढा कडून कोकणातील पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी "एक हात मदतीचा" म्हणून जीवनावश्यक वस्तू,तसेच संसारोपयोगी वस्तूची मदत कोकणातील पूरग्रस्त कुटुंबाला पाठवण्यात आली.
यामध्ये चटई,कपडे,बिस्कीट,वेफर्स, नुडल्स,फरसना पॅकेट आदी वस्तूंची मदत करण्यात आली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रज्वल शिंदे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमोल बचुटे, मीडिया सेल तालुका अध्यक्ष अशोक माने, अजित यादव, परमेश्वर लेंडवे, अभिजित सावंजी, पम्पू कांबळे, सोमनाथ गोवे, ज्ञानेश्वर गोवे, राजाराम घोडके आदी उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा