रक्तदान, वृक्षारोपण आणि पूरग्रस्तांना मदत असे कार्यक्रम
![]() |
रक्तदान, वृक्षारोपण आणि पूरग्रस्तांना मदत असे कार्यक्रम |
पंढरपूर - प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा श्री अर्जुनराव चव्हाण यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून पर्यावरण संवर्धनाचे उद्दिष्ट जपत वृक्षारोपण करण्यात आले.तसेच कोल्हापूर,चिपळूण,रायगड,सांगली,रत्नागिरी, कोकण भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे या भागातील बांधवांना एक मदतीचा हात म्हणुन १००ते१५० ब्लँकेट पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी(प्रांतसाहेब)मा सचिनजी ढोले साहेब यांच्याकडे सुपूर्द केल्या.त्याचबरोबर कोरोनामुळे भासत असलेला रक्ताचा तुटवडा हे लक्षात घेऊन रक्तदान शिबीराचेही आयोजन करून रक्तदान करण्यात आले.यावेळी महिला व मुलींनी रक्तदान करुन आपला सहभाग नोंदवला.
यावेळी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवा नेते मा प्रणव परिचारक,पंढरपूरचे पोलीस निरीक्षक मा अरुण पवार साहेब,डॉक्टर मनोज भायगुडे,डॉक्टर सुमित साळुंखे,मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा अर्जुनराव चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, सचिव गुरुदास गुटाळ,पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष जाधव,तालुका कार्याध्यक्ष शिवाजी मोरे,शहराध्यक्ष अमोल पवार,शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे,शहर संघटक काका यादव, रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड,मालवाहतुक संघटना अध्यक्ष श्रीनाथ माने, राहुल यादव, विभागप्रमुख पांडुरंग शिंदे,विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष जीवन गायकवाड,आढीवचे मा सरपंच एकनाथ(मेजर)चव्हाण,सचिन रोंगे,सुहास निंबाळकर,सुरज पडवळे,मराठा महासंघ शाखा पट कुरोली अध्यक्ष विलास मोरे,सोहम व्होरा,रोहित चव्हाण,विनायक चव्हाण,महेश वडने,प्रविण व्यवहारे,मनीष कुलकर्णी,आकाश साळुंखे,विजय डुबल,मोहीज साळुंखे, यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते,तसेच मित्र परिवार उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा