क्रांतीदिनी बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास सभापती घुमटकर यांची भेट
पुणे - प्रतिनिधी
फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास -कृषी उत्पन्न बाजार समिती खेड चे सभापती विनायकराव घुमटकर यांनी आज 9 ऑगस्ट 2021 रोजी क्रांतिदिनी रोजी सायंकाळी 6 वाजता आवर्जून भेट दिली.यावेळी कृषी समितीचे संचालक रामशेठ गोरे आणि सभापती विनायक घुमटकर यांचे शुभहस्ते सुरुवातीला थोरसमाजसुधारक महात्मा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला .यावेळी चाकण चे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत तुकारामशेठ कांडगे ,संजूशेठ गोरे,आर्किटेक्ट सुहास गोरे, व इंजिनिअर अनिकेत केदारी उपस्थित होते.
यावेळी सभापती घुमटकर यांचे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम ,व सर्व मान्यवरांचे स्वागत महात्मा फुले गीत चरीत्र ,व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले ग्रंथ भेट देऊन केले.
वाचा - वक्तृत्व ही सुंदर कला असून ती प्रत्येकांनी आत्मसात करायला हवी - अभिजीत पाटील
यावेळी तुकाराम शेठ म्हणाले की ढोक यांनी अहमदाबाद चे अनिकेत राऊत आणि भुसावळ ची रूपा महाजन , घटस्फोटीत यांचा विवाह जमवून माझे चाकण च्या मोनिका हॉटेल मध्ये रजिस्टर नोंदणी करून 3 वर्षांपूर्वी पहिला सत्यशोधक पुनर्विवाह लावून फुले दाम्पत्याना जे अपेक्षित कार्य होते ते त्यांनी सुरू केले याचा मी साक्षीदार आहे. .आणि आज त्यांनी सम्पूर्ण महाराष्ट्र नव्हें तर तेलंगाणा राज्यात जाऊन देखील अनेक ठिकाणी पाहिले सत्यशोधक विवाह असे एकूण 28 मोफत विवाह लावलेत.विशेष म्हणजे ते नोकरी करीत विनामूल्य कार्य करीत आहेत.
वाचा -बलात्कारातील आरोपीला ७ वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा
या प्रसंगी सभापती घुमटकर म्हणाले की शिवफुलेशाहुआंबेडकर या महान पुरुषांनी केलेले कार्यावरच महाराष्ट्र पुढे वाटचाल करीत आहे.त्यांनी आपल्याला स्त्री पुरुष समानता आणि मानवता धर्म शिकविला त्या दृष्टीने आपण सर्वांनी काम केले पाहिजे .पुढे ते म्हणाले की आम्ही लवकरच खेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लोकवर्गणीतून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले याचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्यांनी शेतकरी ,व प्रगतशील शेती विषयी केलेल्या महान कार्याची उतराई होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत ,यासाठी आम्ही आज पुण्यात आलो होतो तर ढोक यांनी याकामी वेळोवेळी मार्गदर्शन ,सूचना करावे असे देखील म्हंटले जेणेकरून महाराष्ट्रातील यापुढे एक सारखे पूर्णाकृती पुतळे निर्माण होतील.
वाचा - टोकियो ओलंपिक मध्ये नीरज चोपडाची सुवर्ण फेक
या प्रसंगी सत्यशोधक ढोक म्हणाले की महापुरुषांचे पुतळे उभारताना त्यांनी दिलेल्या कृतीने समाजसेवा देखील करण्याची नितांत गरज आहे. आजपण कोव्हिडं च्या काळात खेड्यापाड्यात आर्थिक अडचणी मुळे मुलांमुलीचे लग्न होत नाहीत त्यासाठी मदतीची गरज आहे .आम्ही पुणे आणि सातारा याठिकाणी आधुनिक सुविधा देऊन मोफत सत्यशोधक विवाह लावण्याची सोय केली आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तीने आम्ही प्रकाशित केलेली फुले दाम्पत्याची पुस्तके मोठया प्रमाणात खरेदी करून जरी मदत केली तरीही आम्ही गरजूची या पैशातून मोफत सत्यशोधक विवाह लावून त्यांना इतर वस्तू देखील देऊन अजून मदत करू शकतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश ढोक व आभार सौ. आशा ढोक यांनी मानले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा