सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
![]() |
rape case solapur |
सोलापूर - प्रतिनिधी
तीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीला, खाऊचे आमिष दाखवून, घरात बोलावून, तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी, आकाश सिद्धाराम शिंदे ( वय २१ रा. सोलापूर ), याला ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी हा निकाल दिला आहे.
नेमके काय आहे प्रकरण ?
सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक महिला, ५ मी २०१७ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरात स्वयंपाक करत होती. त्यावेळी टिचयुता शेजारी राहणाऱ्या एका मुलीने तिला सांगितले कि, घराशेजारी राहणार एक मुलगा, तुमच्या नातीला त्याच्या घरात घेऊन गेला आहे आणि काहीतरी करत आहे. तेव्हा ती महिला त्या मुलाच्या घरी गेली, तर त्या मुलाच्या घराचे दार आतून बंद होते. त्या महिलेने दाराच्या फटीतून पहिले असता, तो तरुण तिच्या नातीवर बलात्कार करत होता.
त्यावेळी त्या महिलेने आरडाओरड केली असता, त्या तरुणाने त्या लहान मुलीला सोडून दिले. महिलेने बालिकेला विश्वासात घेऊन विचारले असता, आकाश नावाच्या त्या तरुणाने त्या लहान मुलीला खाऊसाठी पैसे देतो असे सांगूत घरात बोलावले, असे त्या लहान मुलीने सांगितले. त्यानंतर घडलेला प्रकार त्या महिलेने स्वतः पहिला होता. त्यानंतर महिलेने सदर बझार पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी आकाश शिंदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून, दोषारोपपत्र दाखल केले होते. सर्व बाजूचा युक्तिवाद ऐकून व साक्षीपुरावे तपासल्यावर आरोपी आकाश शिंदे यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात ७ वर्षे सक्त मजूरची शिक्षा ठोठावली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा