![]() |
मंत्री जयंत पाटील यांना पत्र देताना भगीरथ भालकेंनी सोबत माजी आमदार दीपक साळुंखे |
पंढरपूर दि.11- प्रतिनिधी
सध्या पंढरपूर ग्रामीण मध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मा. जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी दि.13 ऑगस्ट, 2021 पासून पंढरपूर तालुक्यामध्ये (लॉकडाऊन) संचारबंदी लावण्याची तयारी दर्शविलेली आहे.
याबाबत श्री भगिरथदादा भालके यांनी आज दि.11.08.2021 रोजी मुंबई येथे मा.ना.श्री जयंतराव पाटील यांची समक्ष भेट घेऊन पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांच्या संख्येबाबत सविस्तर चर्चा करून तसे लेखी पत्रही दिले.
त्यावर मा.ना.श्री जयंतराव पाटील यांनी मा. जिल्हाधिकारी, सोलापूर यांना त्वरीत फोन करून सूचना दिल्या की, पंढरपूर शहरात संचारबंदीसाठी तीव्र विरोध असेल तर पंढरपूर शहरातील सर्व लहान-मोठे व्यापारी, प्रतिष्ठीत नागरिक, सर्व पदाधिकारी यांचे समवेत त्वरीत मिटिंग घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून मगच संचारबंदी (लॉकडाऊन) चा तोडगा काढावा, जेणे करून व्यापारी व नागरिकांवर अन्याय होणार नाही.
सदर मंत्री महोदयांनी त्वरीत मा. जिल्हाधिकारी, सोलापूर यांना फोनवरून दिलेल्या सूचनांमुळे पंढरपूरातील व्यापार्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. "ज्याप्रमाणे आमदार स्व.भारतनाना हे नेहमीच पंढरपूर वासीयांच्या सोबत राहिले त्यांच्या नंतर मीही कायमच आपल्या सोबत राहिन. त्यामुळे व्यापार्यांवर व इतर नागरिकांवर अन्याय होणार नाही" असा विश्वासही श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री भगिरथदादा भालके यांनी दिला.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा