maharashtra day, workers day, shivshahi news,

पंढरपूर विधानसभा मतदार संघात संचारबंदी शिथिल - जिल्हाधिकारी सोलापूर

पंढरपूर विधानसभा मतदार संघात संचारबंदी शिथिल

सोलापूर  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर. यांच्या सूचना 

pandharpur mangalwedha byelection 2021, milind shambharkar, collector solapur, shivshahi news


सोलापूर - ( प्रतिनिधी ) पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक सुरु असल्याने या मतदारसंघात शनिवारी , 10 व रविवारी , 11 एप्रिल रोजी संचारबंदी असणार नाही. या काळात कोरोना नियम पाळून उमेदवारांचा प्रचार करता येणार आहे . उर्वरित जिल्ह्यात मात्र दोन दिवस संचारबंदी चे आदेश कायम असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सायंकाळी पत्रकार परिषदेत शंभरकर यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली . यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे , वरिष्ठ पोलीस अधिकारी पी . आर . पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले , सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी रेल्वे , राज्य कामगार विमा हॉस्पिटल मधील कोरोना विभाग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ही शंभर बेडची क्षमता वाढवण्यात आल्याची ही माहिती शंभरकर यांनी यावेळी दिली . कोरोना लस जितक्या प्रमाणात उपलब्ध होत आहे त्याप्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे . लस कोठेही शिल्लक ठेवण्यात येत नाही . लसीकरणाची कमतरताही नसल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकारांना दिली . पंढरपूर ,- मंगळवेढा मतदार संघ वगळता उर्वरित जिल्हयाभरात यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सुविधा सुरू असणार आहेत . या दोन दिवसात संचार बंदी असणार आहे . वैद्यकीय कारणासाठी संचारबंदीत जाण्याची मुभा असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले ‌.

  " पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा पोटनिवडणुकीसाठी शनिवार , 17 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे . त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांना मतदान करता यावे यासाठी या दिवशीही या मतदारसंघात संचारबंदीत शिथिलता असणार आहे . तरी प्रशासनासह नागरिकांनी सहकार्य करावे. काही नियमभंग केल्यास तीव्र कारवाई करण्यात येईल . "


-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !