अजित पवार यांचा डोळा विठ्ठल कारखान्यावर ? - माजी मंत्री राम शिंदे
मंगळवेढा -( प्रतिनिधी ) अजित पवारांनी नगर जामखेड चा जगदंबा कारखाना ताब्यात घेतला , नुकताच समजले आहे कि त्यांनी करमाळा तालुक्यातील आदिनाथ सुद्धा घेतला आहे. आता त्यांचा डोळा विठ्ठल कारखान्यावर आहे . असा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी केला.
पंढरपूर विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी , गणेश वाडी , शेलेवाडी , डोंगरगाव , अकोला , गुंजेगाव , ममदाबाद या भागात प्रचार सभा झाल्या . या सभांना राज्याचे माजी मंत्री राम शिंदे , माजी मंत्री सदाभाऊ खोत , आमदार सचिन कल्याण शेट्टी , भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख , रयत क्रांती चे दीपक भोसले , शहाजी पवार , येताळा भगत , औदुंबर वाडदेकर , आदी उपस्थित होते. समाधान आवताडे म्हणाले की , महा विकास आघाडीने शेतकऱ्यांची वीज तोडण्याचे काम केले. आता मत रुपी आशीर्वाद मला द्या असे आवाहन केले
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा