maharashtra day, workers day, shivshahi news,

तुझी कुठं घालायची ती घाल' - अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांना इरसाल सल्ला

कल्याणराव काळेंचे पुन्हा पक्षांतर

अजित पवार यांच्या साक्षीने पंढरपुरात काळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश

पंढरपूर - ( प्रतिनिधी ) सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी पुन्हा पक्ष बदलून भाजपातून राष्ट्रवादी  प्रवेश केला आहे . २०१४ मध्ये त्यांनी कांग्रेस शिवसेना काँग्रेस असा प्रवास ककेला होता , तर २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपवासी झाले होते . मात्र आता त्यांना आपला रस्ता चुकल्याची झाली असून त्यांनी अजित पवार यांच्या साक्षीने हातात घड्याळ बांधले आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत कल्याणराव राष्ट्रवादीत झाले असून त्यांचा हा पक्षप्रवेश महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना किती फायदेशीर ठरतो ते येत्या २ मे रोजी कळणार आहे . 

पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे चार महिन्यांपूर्वी दुःखद निधन झाले. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षाचे नेते भालके कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी भारत भालके यांच्या साकोली गावी आले होते. त्यावेळी शरद पवार साहेब सरकोलीत आले होते तेंव्हा कल्याणरावही पवार साहेबांसोबत होते . त्याचवेळी पवारसाहेबांनी काळे यांना विठ्ठल परिवार एकत्र करून काम करण्याच्या सूचना केल्या होत्या त्याला प्रतिसाद देत कल्याणराव जातील अशी कुणकुण लागली होती. त्याप्रमाणे आज पंढरपूर येथील श्रीयश पॅलेस येथे झालेल्या कार्क्रमात कल्याणराव काळेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान भाजप नेतृत्वाकडून काही प्रमाणात कल्याणराव काळेंनी पक्ष नये यासाठी प्रयत्नही केले . नुकतेच हर्षवर्धन पाटील यांनी पंढरपूर मध्ये माध्यमांशी बोलताना कल्याणराव काळेंनी भाजप सोडू नये असे आवाहन केले होते परंतु कल्याणरावांवर त्याचा परिणाम झाला  त्यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

ajit pawar , harshawardhan patil, kalyan kale, pandharpur, NCP, BJP, shivshahi news

तुझी कुठं घालायची ती घाल

 कल्याणराव काळेंच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात काळेंचे स्वागत करताना केलेल्या भाषणात अजित पवार यांनी कल्याणराव कळेना उद्धेशून "तुमचा मधल्या काळात ट्रॅक चुकला होता . भाजपच्या भपकेपणाला तुम्ही भुललात , अन्यथा तुमचे यापूर्वीच आम्ही कल्याण केले असते , असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. तर कल्याणराव काळेंना पक्ष सोडू नका म्हणणाऱ्या हर्षवर्धन पाटलांचे नाव ना घेता " पक्षात असताना  लक्ष दिले नाही आणि आता त्यांना पक्ष सोडू नका म्हणता , पण कल्याणराव आता आमच्या पक्षात आहेत, तुझी कुठं घालायची ती घाल' असा इरसाल सल्ला दिला . 

 पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी काळे म्हणाले , विठ्ठल परिवार एकत्र असला पाहिजे . भविष्यात परिवाराची ताकद विरोधकांना दाखवली पाहिजे. परिवार एकत्र आला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती. मधल्या काळात माझा ट्रॅक चुकला होता. आता जिल्हा सगळा राष्ट्रवादीमय करणार. खासदार शरद पवार यांची ताकद कायमस्वरूपी आमच्या पाठीशी असते. इथून पुढच्या काळात कायमस्वरूपी राष्ट्रवादीचे काम करणार असून आपण यापुढे शरद पवार जे सांगतील , त्या पद्धतीने काम करणार.

स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी खासदार शरद पवार काही दिवसांपूर्वी सरकोली येथे गेले होते. या सर्व कार्यक्रमात कल्याणराव काळे यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली होती ‌. तेव्हापासूनच कल्याणराव काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आज अखेर या सर्व चर्चाना पूर्णविराम मिळाला

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !